पुणे

विहीरीचे मोजमाप घेताना दरड कोसळून एकाचा मृत्यू; पाच जणांविरुद्ध गुन्हा

CD

विहिरीचे मोजमाप घेताना
दरड कोसळून एकाचा मृत्यू
झरे येथील घटना; पाच जणांविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. २५ : विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मोजमाप घेत असताना दरड कोसळून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना करमाळा तालुक्यातील झरे येथे घडली. या प्रकरणी काम घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अक्षय नागनाथ रकटे (रा. वांगी नं. १, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल जगताप, आकाश जगताप, विशाल वारे, अप्पासाहेब शिंदे (सर्व रा. जातेगाव) आणि विनोद शिंदे (रा. खडकी) यांनी झरे येथील एका शेतातील विहिरीचे काम घेतले होते. २३ जून रोजी दुपारी विहिरीचे मोजमाप घेण्यासाठी नागनाथ अर्जुन रकटे (वय ५५) यांना विहिरीत उतरविण्यात आले. मात्र, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना न केल्याने अचानक दरड कोसळली. दगड-मातीचा मोठा ढिगारा अंगावर पडल्याने नागनाथ रकटे यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी करमाळा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र ढोरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT