railway esakal
पुणे

Railway : गाड्यांना उशीर चालेल; पण ट्रॅक सुरक्षितच हवा

बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड अॅक्शन मोडमध्ये आले आहे. प्रत्येक विभागाला कृती आराखडा सादर करण्याची सूचना देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड अॅक्शन मोडमध्ये आले आहे. प्रत्येक विभागाला कृती आराखडा सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे रेल्वे प्रशासन २६ आठवड्यांचा कृती आराखडा तयार करीत आहे.

रुळांच्या सुरक्षेविषयी कोणत्याही परिस्थितीत निष्काळजी न राहण्याच्या सूचना देशातील सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही विभागाला ब्लॉक घेणे आवश्यक असेल तर त्यांना तो आपत्कालीन परिस्थितीनुसार देण्याची सूचना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आली आहे.

बालासोर रेल्वे अपघातानंतर पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. गुरुवारी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंग यांनी सिग्नलींग आणि टेलिकॉम, टीआरडी विभागाच्या अधिकाऱ्यांची व अभियंत्याची बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीत प्रवासी सुरक्षेला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.

ऐनवेळी ब्लॉक घ्यावे लागले तरी चालेल, गाड्यांना थोडा उशीर झाला तरीही चालेल पण प्रवासी सुरक्षितता महत्त्वाची आहे. कर्मचाऱ्यांना योग्य ती सुविधा दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत गाड्या मॅन्युअली जाणार नाहीत. जो पर्यंत इंटरलॉकिंगचे काम पूर्ण होणार नाहीत. तोपर्यंत गाड्या धावणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आला.

अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पुण्यासह अन्य विभागांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कार्यालयात बसून न राहता स्थानक, यार्डवर जाण्याची सूचनाही त्यांना करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विभागातील अधिकारी स्थानकावर परीक्षण करताना दिसून येत आहेत. गुरुवारी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे रेल्वेत प्रवाशांची तिकिटे व सामान तपासात होते, तर सहायक परिचालन व्यवस्थापक सचिन पाटील यार्डात जाऊन मालगाडीला इंजिन व वॅगन जोडण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्नशील होते.

बालासोरसारखा अपघात पुणे विभागात व देशात पुन्हा होऊ नये यासाठी विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. प्रवासी सुरक्षेशी कोणत्याही स्थितीत तडजोड केली जाणार नाही. अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यावर भर दिला जात आहे.

- बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

Latest Marathi News Live Update: लोणावळ्यातील पूरस्थितीमागील कारणांचा होणार शास्त्रीय अभ्यास; सीडब्ल्यूपीआरएसतर्फे भुशी धरण आणि इंद्रायणी नदीचे 'हायड्रॉलिक मॉडेल स्टडी'

SCROLL FOR NEXT