Transgender Community Protest against bjp MLA nitesh rane in Pune  
पुणे

Transgender Protest In Pune : राणेंचा 'तो' शब्द अन् तृतीयपंथीयांचा कोप…; रस्त्यावर उतरून केलं जोडे मारो आंदोलन

रोहित कणसे

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नागपूरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपकडून उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार हलाल केला जात आहे. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना केलेल्या विधानावरून नवा वाद पेटला आहे.

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांचा एक मॉर्फ केलेला फोटो ट्वीट केला होता. यासोबतच त्यांनी "मर्दानगी वर कलंक! हिजड्यांच्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा.. बायला कुठला!!" असं कॅप्शन देखील दिलं होतं. यानंतर राणे यांच्या विरोधात तृतीयपंथी आक्रमक झाले असून त्यांच्याकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथी समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

यावेळी पोलीस सरकारच्या दबावामुळे राणेंविरोधात गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप तृतीयपंथी समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच जोपर्यंत या प्रकरणी गुन्हा धाकल केला जात नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलने करणार असल्याचा इशारा तृतीयपंथी बांधवांकडून देण्यात आला आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT