yas.jpg 
पुणे

Video : लंडनमध्ये अडकले होते...पैसे संपले...व्हिसाची मुदतही, पण...

सकाळवृत्तसेवा

पुणे : मायदेशापासून कोसो दूर लंडनमध्ये होते. परंतु, कोरोनामुळे तेथेही लॉकडाऊन घोषित झाला. हातातील नोकरी गेली, जवळचे पैसेही संपले अन व्हिसाची मुदतही संपली. देशात परतायचे होते, परंतु वारंवार अर्ज करूनही उपयोग होत नव्हता. मात्र, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी टाकलेल्या फेसबुक पोस्टवरून त्यांना संपर्क साधला अन सूत्रे वेगाने हलली. त्यामुळे मला मायदेशी परतता आले, अशा शब्दांत यशा पालनकर हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

लॉकडाउनमुळे काही दिवसांपासून लंडनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी दोन दिवसांपूर्वी अखेर मायदेशी परतले. गौरांग तांदुलवडकर, यश साली व यशा पालनकर (महाराष्ट्र), रिषभ सरसुनिया (दिल्ली), आयुष भुतानी व नवदीप जंगीर (राजस्थान) हे त्यातील काही विद्यार्थी. यातील तीन जण पुण्यातील आहेत. 

परतीच्या प्रवासाबद्दल यशा म्हणाली, ""लंडनमध्ये स्थलांतराचा अर्ज भरूनही कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. दोन महिन्यांपूर्वी व्हिसाची मुदत संपत आली होती. मी परतीच्या प्रवासासाठी खूप प्रयत्न केले. भारतीय दुतावासाकडून "आम्ही प्रयत्नांत आहोत' इतकेच उत्तर मिळत होते. तीन-चार विमान येऊन गेली; परंतु यादीत माझे नाव येतच नव्हते. माझी नोकरी गेली अन जवळचे पैसेही संपले. त्यामुळे काय करावं, हे समजतच नव्हतं.'' 

दरम्यान, गुरनानी यांची फेसबुकवरील पुण्यातील काही विद्यार्थ्यांच्या स्थलांतराबाबतची पोस्ट वाचली अन मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर गुरनानी यांनी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्याशी त्वरित संपर्क साधला. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे माझे नाव स्थलांतरित प्रवाशांच्या यादीत आले अन अखेर आम्ही मायभूमीमध्ये परतलो, असे यशाने भावुक होत सांगितले. 
पुण्यावरून या आठ शहरांसाठी सुरू झाली विमानसेवा

लंडनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी फेसबुकद्वारे संपर्क साधून मदतीसाठी विनंती केली. त्यानंतर मी त्वरित ट्‌वीटरद्वारे सुप्रिया सुळे आणि धीरज शर्मा यांना माहिती कळविली. त्यानंतर त्यांना मायदेशी आणण्यासाठी वेगाने पावले उचलण्यात आली. - गिरीश गुरनानी, 
पुणे शहर सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT