पुणे - ३ देशांचा दुचाकी प्रवास करून पुण्यात परतल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जमलेले तरुण.
पुणे - ३ देशांचा दुचाकी प्रवास करून पुण्यात परतल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जमलेले तरुण. 
पुणे

दुचाकीवरून केला तीन देशांचा प्रवास

महादेव पवार

पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी १२ हजार किलोमीटर अंतर केले पार
वारजे - गिरिकूजन ट्रेकिंग संस्थेतर्फे कोथरूड, कर्वेनगर, वारजे भागांत राहणाऱ्या सहा तरुणांनी दुचाकीवरून भूतान, बांगलादेश, नेपाळ या तीन देशांचा व १८ राज्यांचा प्रवास पूर्ण केला. पर्यावरण संवर्धनासाठी आखलेल्या या मोहिमेत त्यांनी दुचाकीवरून तब्बल पन्नास दिवस प्रवास करत बारा हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रवींद्र पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली अरुण मोरे, सुनील अभंग, रोहित ढमाले, अनिल पोकळे, गिरीश काटे हा सहा जणांचा संघ कोथरूड येथील शिवाजी महाराज पुतळा चौक येथून मार्गस्थ झाला. कोथरूड येथील किर्लोस्कर कमिन्स कंपनीत हे काम करतात. यावेळी गिरिकूजन संस्थेच्या माधवी माने, किर्लोस्कर कमिन्समधील प्रतिनिधी उपस्थित होते. या तरुणांनी संपूर्ण प्रवासात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली. पर्यावरणाचे रक्षण करा, वृक्षलागवड करा, प्लॅस्टिक वापरू नका असे संदेश देत ते नाशिक, इंदूर, लखनऊ, गोरखपूर मार्गे नेपाळला पोचले. 

या दरम्यान त्यांनी बिहारच्या एका शाळेमध्ये व नेपाळमध्ये प्लॅस्टिक संदर्भात जनजागृती केली. त्यानंतर ते सिक्कीम येथे पोचले. येथे बर्फाळ भागातून प्रवास करत त्यांनी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम नागरिकांना सांगितले. पुढे या संघाने भूतान देशामध्ये प्रवेश करून तेथील थीम्पू, पारो, पूनाखा या ठिकाणी भेटी दिल्या. पुढे अरुणाचलमधील तवांग येथून बुमला पास व चायना बॉर्डरपर्यंत उणे दोन अंश तापमानात तरुणांनी आपली दुचाकी चालवली. नागालॅंडच्या दिशेने प्रवास करत काझीरंगाचे अभयारण्य पार केले. या पन्नास दिवसांच्या काळात त्यांनी ऊन, पाऊस, बर्फवृष्टी अंगावर झेलत हा प्रवास पूर्ण केला.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आम्ही ही मोहीम आखली. पन्नास दिवसांमध्ये तरुणांनी ठिकठिकाणी जनजागृती केली. 
- दीपक मोरे, अध्यक्ष, गिरिकूजन ट्रेकिंग संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT