पुणे

माणमध्ये वृक्षांची बेसुमार कत्तल

सकाळवृत्तसेवा

हिंजवडी - जागतिक दर्जाच्या राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील इन्फोसिस कंपनी परिसरातील शेकडो वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. घटनेला १५ दिवस उलटूनही एमआयडीसीकडून संबंधितांवर कारवाई केली नसल्याने हिंजवडी, माण परिसरातील पर्यावरणप्रेमींनी त्याचा निषेध केला. 

कत्तल केलेल्या झाडांची लाकडे वाहून नेणारा टेंपो मुळशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला असून, त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे वनअधिकारी पोपटराव कापसे यांनी सांगितले. 

इन्फोसिसने इन्फोटेक पार्कच्या दुसऱ्या फेजमध्ये मुख्य रस्त्यालगत हजारो झाडे लावली आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ती जतन केल्याने इन्फोसिसचा परिसर सुशोभित झाला होता.

दरम्यान, वनविभागाने वृक्षतोडीचा पंचनामा केला असून, याबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठीचा अहवाल एमआयडीसीकडे पाठविला असल्याचे कापसे यांनी सांगितले. 

याबाबत एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, की वनविभागाने केलेल्या कारवाईचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. अहवाल येताच वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनांनुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल.

होर्डिंगसाठी वृक्षतोड
हिंजवडी, माण परिसरात अनेक कंपन्या व ग्रामपंचायतीतर्फे दरवर्षी हजारो रोपांची लागवड केली जाते. मात्र, मुख्य रस्त्यालगत उभारलेल्या बेकायदा होर्डिंगसाठी शेकडो झाडांची कत्तल करीत असल्याचे चित्र आहे. यावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी माणचे माजी उपसरपंच संदीप साठे यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: ईव्हीएमबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : फ्रेझर-मॅकगर्कचं तुफानी अर्धशतक, दिल्लीची मुंबईविरुद्ध आक्रमक सुरुवात

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

SCROLL FOR NEXT