पुणे

पिंपरी-चिंचवडमध्येही 'आरे'?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी (पुणे) : चिखली येथील गायरानावरील नियोजित 100 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अंदाजे एक हजार 527 झाडे काढण्याची पूर्वतयारी महापालिकेने केली असून, त्याच्या कामाला गुरुवारी (ता. 5) सुरुवात झाली. मात्र जीपीएस तंत्रज्ञानाच्या आधारे तेथे प्रत्यक्षामध्ये सुमारे साडेतीन हजार झाडांची मोजणी करण्यात आली आहे. जादा झाडांची मोजणी कशासाठी केली, याबाबत उद्यान विभागाने मौन बाळगले असून, प्रकल्पासाठी कमीत कमी झाडे काढण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. झाडांच्या पुनर्रोपणाचे पालिकेकडे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. 

हा प्रकल्प वेळेपूर्वीच मार्गी लागावा यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी दोन टप्प्यांत तेथील झाडांची मोजणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात प्रकल्पाच्या जागेवरील झाडे आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जागेवरील झाडांचा समावेश करण्यात आला आहे. ठेकेदाराकडील सहा मदतनिसांच्या साह्याने तेथील झाडांची पुनर्तपासणी आणि मोजणी करण्याचे काम तेथे दिवसभर सुरू होते. प्रत्येक झाडाला क्रमांक देण्यात आला असून त्याआधारे त्याची प्रजाती आणि गुगल ऍपद्वारे त्याचे अक्षांश-रेखांश निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यानुसार तेथील झाडांची संख्या साडेतीन हजारांहून अधिक झाली आहे. त्याबाबतचा अहवाल लवकरच ठेकेदाराकडून महापालिकेला सादर केला जाणार आहे. 

उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक हजार 526 झाडे काढण्यात येणार असून त्यापैकी 227 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. मात्र, जादा झाडांची मोजणी कशासाठी झाली, यावर विभागाने मौन बाळगले आहे. प्रकल्पाच्या जागेवर गिरिपुष्प, सुबाभूळची सर्वाधिक झाडे आहेत. निलगिरी, साग, चिंच, कडुनिंब, खैर, पळस, सीताफळ, खिरणी अशी 17 ते 20 प्रजातींची झाडे आहेत. 

असा आहे प्रकल्प 

  • चिखली येथील शासकीय गायरान गट क्र. 1654 
  • मंजूर विकास योजनेत जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी क्षेत्रफळ 8 हेक्‍टर 
  • 100 एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाचे 13 सप्टेंबरला कामाचे आदेश 
  • उभारणीसाठी 47 कोटी रुपये खर्च होणार 
  • पुढील 10 वर्षांच्या संचलनासाठी 32.54 कोटी रुपये खर्च होणार 
  • पहिल्या टप्प्यात देहू येथे बंधारा बांधून आंद्रा धरणामधून पाणी उचलले जाणार 
  • कोट 

ही झाडे तोडण्यास परवानगीची गरज नाही. प्रकल्पाच्या खोदाई केलेल्या जागेवरील झाडे काढली जाणार आहेत. कमीत कमी झाडे काढण्यासाठी प्रयत्न राहतील. काढलेल्या झाडांचे उद्यान विभागाच्या नर्सरीत, इंद्रायणी नदीकडेला पुनर्रोपण केले जाईल. 
- प्रकाश गायकवाड, उद्यान अधीक्षक   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayanta Patil: सांगलीच्या अपक्ष उमेदवाराची मी शिफारस केलेली, मात्र... जयंत पाटलांचा मोठा खुलासा

IPL 2024 : पराभव विसरा, पुढच्या तयारीला लागा... कर्णधारने सहकाऱ्यांना दिला मोठा सल्ला

Malaria Vaccine : मलेरियाच्या विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन लस, जेएनयू विद्यापीठाचे संशोधन

जीव वाचवण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली! नगरच्या प्रवरा नदीत तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

Latest Marathi News Update: प्रज्वल रेवन्ना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT