tribal woman raised her grievances supriya sule pune politics
tribal woman raised her grievances supriya sule pune politics sakal
पुणे

Pune News : कार्यक्रम सुरू असताना भर गर्दीतून 'ती' थेट स्टेजवर गेली अन् म्हणाली, 'मला बोलायचंय ...'

निलेश बोरुडे

सिंहगड : एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय घोडेगाव व उपविभागीय अधिकारी हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबवून वर्षानुवर्षे शासकीय सुविधांपासून वंचित असलेल्या पश्चिम हवेलीतील आदिवासी कातकरी नागरिकांना आधार कार्ड, रेशनकार्ड काढून देण्यात आले आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे व पुणे जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे यांच्या माध्यमातून गोऱ्हे बुद्रुक येथे संबंधित लाभार्थ्यांना आधार कार्ड व रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. नियोजनाप्रमाणे कार्यक्रम सुरू असताना अचानक एका ज्येष्ठ आदिवासी कातकरी महिलेच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या आदिवासी विकास विभागातील रेणूका जाधव या उपस्थित मान्यवरांना भाषणासाठी निमंत्रित करत होत्या व त्याप्रमाणे भाषणे होत होती. अचानक अनुसया नामदेव जाधव ही साठ ते पासष्ट वर्षांची ज्येष्ठ कातकरी महिला उठली आणि सभागृहातील गर्दीतून थेट स्टेजवर गेली. स्टेजवरील मान्यवर व समोर बसलेले कातकरी बांधव अनुसया जाधव यांच्याकडे पाहत होते. अनुसया जाधव यांनी माइक कडे हात केला आणि 'मला बोलायची' म्हटल्या !

'आमाला आज पहिल्यांदा माणसात आल्यासारखं वाटलंय' हे पहिलं वाक्य अनुसया जाधव बोलल्या आणि संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. 'आमाला सगळे कागदं मिळाली पायजे, राह्यला जागा पायजे, जागा मिळाली तर घरं होत्यान.

आमाला बी लेकरांना शिकवावा वाटतं. वढ्याखोड्यानी फिरणारी लेकरं साळत जातील. सरकारनी आमची कायतरी सोय कराया पायजे', असं बोलत अनुसयाबाईंनी सर्वांची मनं जिंकली. अनुसया जाधव यांचं बोलनं पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले कारण सर्व कातकरी समाजाच्या मनातील भावना त्या बोलल्या होत्या.

खासदार सुप्रिया सुळे या बोलायला उभ्या राहिल्यानंतर अनुसया जाधव यांच्या बोलण्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला व कातकरी नागरिकांना निवाऱ्यासाठी हक्काची जागा मिळावी यासाठी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा शब्द दिला.

दै. सकाळ'ने या आदिवासी कातकरी समाजाच्या व्यथा सातत्याने मांडल्याबद्दल व त्यामुळे या नागरिकांना आधार कार्ड, रेशनकार्ड व इतर कागदपत्रे मिळण्यास सुरुवात झाल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सकाळ'चे विशेष आभार मानले. तसेच पुरवठा विभागातील परिमंडळ अधिकारी गजानन देशमुख हे या आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड देण्यासाठी तत्परतेने सहकार्य करत असल्याबद्दल सुळे यांनी त्यांचेही कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT