A tribute to many people For Dr. Shriram Lagoo including CM Thackreay and Sharad Pawar
A tribute to many people For Dr. Shriram Lagoo including CM Thackreay and Sharad Pawar 
पुणे

महाराष्ट्र प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला; पवारांसह अनेकांची लागूंना श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

नाटक आणि सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं आज (ता. १७) पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. सूर्य पाहिलेला माणूस, नटसम्राट यांसारखी नाटकं असतील किंवा पिंजरा अजरामर सिनेमा असेल, डॉ. लागू यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला सर्वोत्तमरित्या सादर केलं. यासह हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. 'झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच !' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी तसेच, हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले असून पिंजरामधील मास्तर आणि सिंहासनमधला मंत्री त्यांनी जबरदस्त पद्धीतीने उभा केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कान, नाक घशाचे डॉक्टर ते एक उत्तम अभिनेता; डॉ. लागू यांची वादळी कारकीर्द

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. पिंजरा, सामना यांसारखे चित्रपट आणि नटसम्राट, हिमालयाची सावली यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट-नाट्यसृष्टी जीवंत केली. माझी डॉ. लागू यांना विनम्र श्रद्धांजली, अशा शब्दात भाजपनेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. लागूंना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात डॉ. लागू यांनी मोठे योगदान दिले आहे. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टी सुद्धा त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या, कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

आपण एक अष्टपैलू व्यक्तिमत्व गमावले आहे.या अनोख्या नाट्य अभिनेत्याने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले आणि प्रभाव निर्माण केला. एकाच वेळी ते सामाजिक कार्यकर्तेही होते. महान कलाकार श्रीराम लागू यांना माझी श्रद्धांजली, अशा शब्दांत केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लागूंना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनामुळे चित्रपट आणि नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड गेले आहेत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे म्हणत लागूंना श्रद्धांजली वाहिली आहे.

 
मराठी रंगभूमीला आणि अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारे कलाकार आज आपल्यातून निघून गेले. अशा दिग्गज कलाकाराला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई यांनी श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागु यांच्या निधनाने एका नटसम्राटाची एक्झिट झाली असल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT