पुणे

गुरुवारी भव्य तिरंगा रॅली

CD

कऱ्हाडला उद्या तिरंगा रॅली

दहा हजार नागरिक होणार सहभागी; नियोजन बैठक

कऱ्हाड, ता. ११ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तिरंग्याचा आणि देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शूर जवानांचा सन्मान करण्यासाठी येथे गुरुवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजता तिरंगा यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, विविध संघटना, शासकीय अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त येथे आयोजित तिरंगा रॅलीच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.
आमदार डॉ. भोसले म्हणाले, ‘‘देशातील नागरिकांत राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ करणे, देशप्रेम वाढविणे आणि राष्ट्रीय एकात्मता व ऐक्याची भावना मजबूत करणे, या उद्देशाने ही तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता लाहोटी कन्याशाळा येथून सुरू होणारी ही तिरंगा रॅली चावडी चौक, आझाद चौक मार्गे शिवतीर्थ दत्त चौक येथे पोहोचणार आहे. या रॅलीत नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन जात, धर्म, पक्षीय विचार आणि सामाजिक भेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
बैठकीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, सदस्य दादासाहेब मरगळे, विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक शिवाजी पवार, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे संचालक बाळासाहेब जगताप, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष प्रमोद पाटील, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीला लाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

............
चौकट
............


३२५ फूट लांब झेंड्याचे आकर्षण

या तिरंगा रॅलीत १० हजार नागरिक सहभागी होणार असून, रॅलीसाठी विशेष ३२५ फूट लांब आणि १० फूट रुंदीचा तिरंगा ध्वज मागविला आहे. हा भव्य तिरंगा रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.


W41667
कऱ्हाड : तिरंगा रॅलीच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत बोलताना डॉ. अतुल भोसले.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT