पुणे

ट्रम्प यांच्या दौऱ्यात तणाव निवळण्याची आशा

CD

ट्रम्प यांच्या दौऱ्यात तणाव निवळण्याची आशा

बीजिंग, ता. १३ (पीटीआय) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यात ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी आखाती युद्धासह विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांचे हे दोघे प्रमुख सातव्यांदा समोरासमोर भेटत असून, यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये दक्षिण कोरियातील बुसान येथे त्यांची भेट झाली होती.
ट्रम्प यांचा नऊ वर्षांतील हा दुसरा चीनदौरा असून, ५२५ अब्ज डॉलरच्या निर्यातीवर परिणाम करणाऱ्या व्यापार शुल्काचा वाद मिटवून करार करण्यावर या भेटीत भर दिला जाणार असल्याचे ‘व्हाइट हाउस’तर्फे सांगण्यात आले. ट्रम्प यांच्याबरोबर अमेरिकेतील बड्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारीही चीनला आले आहेत. ट्रम्प हे आज चीनमध्ये दाखल होणार असून गुरुवारी त्यांचे अधिकृत स्वागत होणार आहे. याच दिवशी ते जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. शुक्रवारी स्नेहभोजन आणि औपचारिक चर्चा होणार असल्याची माहिती अमेरिकेच्या उपप्रसारण सचिव ॲना केली यांनी दिली. या दौऱ्यापूर्वी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये दक्षिण कोरियात चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. या दौऱ्यात व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), तंत्रज्ञान, तैवानचा मुद्दा, इराण आणि पश्चिम आशियातील सुरक्षा तसेच पुरवठा साखळी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे करार होणार
ट्रम्प हे अमेरिकी अन्नधान्य आणि विमानांच्या खरेदीबाबत काही महत्त्वाचे करार करण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील मतभेद सोडवण्यासाठी ‘बोर्ड ऑफ ट्रेड'' स्थापन करण्याचाही विचार आहे. या दौऱ्यात ‘टेस्ला’चे एलॉन मस्क आणि ‘ॲपल’चे टिम कूक हेदेखील सहभागी होणार आहेत. दरम्यान, आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत या भेटीत काय तोडगा निघतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला विरोध आणि आखाती प्रदेशातील स्थिरता यावर चीननेही भर दिला आहे. तैवानच्या मुद्द्यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा अपेक्षित असून, अमेरिकेने यावर योग्य भूमिका घ्यावी, असे आवाहन चीनने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT