crime sakal
पुणे

दोन तोतया पत्रकारांना अटक, दोन लाखांची मागितली होती खंडणी

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिस अधिकाऱ्याच्या नावाने माहिती अधिकार कार्यकर्त्यास गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा तोतया पत्रकारांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Two fake journalists arrested in ransom case)

राहुल कांबळे व जहीर मेमन अशी अटक केलेल्या तोतया पत्रकारांची नावे आहेत. या प्रकरणी सुधीर रामचंद्र आल्हाट (वय ५१, रा. नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली. आल्हाट हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. काही दिवसांपूर्वी कांबळेने आल्हाट यांना फोन करून भेटायला बोलाविले होते. त्याप्रमाणे आल्हाट हे कांबळे व मेमन यांना एका हॉटेलात भेटले. तुमच्याविरुद्ध पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करून तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हाला या प्रकरणातून वाचायचे असेल तर आम्हाला दोन लाख रुपये द्यावे लागतील.

तुम्ही दोन लाख रुपये दिल्यास सुरक्षित राहाल, नाहीतर पोलिस अधिकारी तुम्हाला आतच टाकतील, अशी धमकी दिली. राहुल कांबळे याने पोलिस अधिकारी, वकील व इतर दोन ते तीन जणांना फोन करून सुधीर आल्हाट यांच्या विरुद्ध आम्ही केलेल्या तक्रारी मागे घेत आहोत, असे सांगितले. यानंतर आल्हाट यांनी दोघांना ७५ हजारांची रक्कम दिली. मात्र उर्वरित सव्वा लाख रुपयांसाठी दोघांनी आल्हाट यांच्याकडे तगादा लावला. या प्रकाराला वैतागून आल्हाट यांनी खंडणी विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : एमपीएससी सचिवांना काळं फासल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT