pune sakal media
पुणे

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दोन लिपिक लाच घेताना पकडले

बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अभियांत्रिकीचा शासकीय परवाना मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन लिपिकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कनिष्ठ लिपिक तानाजी गोविंदराव दबडे (वय ५०) व लिपिक विलास दगडू तिकोणे (वय ५०), अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने ‘एसीबी’कडे तक्रार दिली होती. तक्रारदाराचा मुलगा अभियंता आहे. त्याचा सुशिक्षित बेरोजगार अभियांत्रिकीचा परवाना मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव त्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे पाठविला होता. त्यावेळी तिकोणे याने हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर दबडे यानेही हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी केली. तडजोडीनंतर २५ हजार रुपयांऐवजी १५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.

दरम्यान, तक्रारदाराने याबाबत ‘एसीबी’कडे तक्रार दिली. त्यानुसार ‘एसीबी’ने शुक्रवारी मध्यवर्ती कार्यालयातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये सापळा रचून १५ हजार रुपयाची लाच घेताना दबडे यास, तर तिकोणे यास लाच मागण्यासाठी मदत केल्याप्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती ‘एसीबी’चे सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT