उरुळी कांचन येथे टोळीयुद्धातुन भर दिवसा गोळीबार, दोघांचा मृत्यु sakal
पुणे

उरुळी कांचन येथे टोळीयुद्धातुन भर दिवसा गोळीबार, दोघांचा मृत्यु

एकजण गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल

पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा

उरुळी कांचन येथे टोळीयुद्धातुन भर दिवसा गोळीबार, दोघांचा मृत्यु

एकजण गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल

पुणे : उरुळी कांचन येथील तळवडे चौक परिसरात शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यु झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे. गोळीबाराची ही घटना टोळीयुद्धातुन झाली असण्याची शक्‍यता आहे.

संतोष संपतराव जगताप याच्यासह आणखी एकाचा मृत्यु झाला आहे. तर आणखी एकजण जखमी असून उपचार सुरू आहेत. जगताप व त्याचा साथीदार गंभीर जखमी आहेत. तर विरुद्ध टोळीतील एकजण गंभीर जखमी झाला आहे. संतोष जगताप, त्याच्या अंगरक्षकासह शुक्रवारी दुपारी तळवडे चौकात थांबला होता. त्यावेळी तेथे आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्‍याने त्यांच्या धारदार शस्त्रांनी वार करण्याबरोबरच त्यांच्यावर गोळीबारही केला, त्यावेळी जगतापला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेतच त्याने प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला, त्यामध्ये टोळक्‍यातील एकाला गोळी लागून त्याचा मृत्यु झाला. जगताप यास जखमी अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपुर्वीच त्याचा मृत्यु झाला. या घटनेत आणखी एकजण जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, यांच्यासह गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जगताप व त्याच्या साथीदाराची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

जगताप हा अप्पा लोंढे टोळीचा सदस्य आहे. त्यांच्या विरुद्ध टोळीचे जगताप याच्याशी वाद होते. वाळुची ठेकेदारी व अन्य कारणामुळे, तसेच पुर्व वैमनस्यातुन हा गोळीबार झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oil Refinery: युद्ध सुरू असताना ट्रम्प यांची 300 अब्ज डॉलरच्या तेल रिफायनरीची घोषणा! अंबानींच्या रिलायन्सचे मानले आभार; कारण काय?

गौरव खन्नाला बिग बॉसने गंडवल ? ना गाडी मिळाली ना पैसे ; "मला काहीच मिळालं नाही.."

LPG संपला तर सरकार लाकूड देणार; मंत्री महोदयांनी वन विभागाला दिल्या सूचना

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

ICC T20I Rankings: वरुण चक्रवर्तीनं 'नंबर वन'चा ताज गमावला, तर अभिषेक शर्माच्या सिंहासनाला इशान किशनचं देतोय आव्हान

SCROLL FOR NEXT