Accident 
पुणे

फुल तर्राट झालेल्या भाऊने सिंहगड रोडवर दोघांना कारने उडविले

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी (पुणे) : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील राज हॉटेलच्या समोर एका मद्यधुंद कार चालकाने दुचाकीवरील दोघांना जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. दोन्ही जखमींना उपचारासाठी नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विनोद कुमार रझ्झाक आणि इमरान अब्दुल्ला शेख (रा.नांदेड, ता.हवेली) अशी दुचाकीवरील जखमींची नावे असून दोघांच्याही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. आकाश बंडगर आणि गणेश मेहेत्रे (रा.सोमवार पेठ, पुणे) अशी चारचाकीतील दोघांची नावे असून यापैकी आकाश बंडगर हा मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत होता. दुचाकीला धडक देऊन दोघेही आपल्या चारचाकीतून पळून जात होते. मात्र, गोऱ्हे बुद्रुक येथील तरुणांनी त्यांना डोणजे फाट्याजवळ गाठले आणि पुन्हा अपघातस्थळी आणले. गोऱ्हे बुद्रुक येथील तरुणांनी खानापूर येथील रुग्णवाहिकेला फोन करून जखमींना दवाखान्यामध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली.

साहेबांनी गाडीतून उतरण्याची तसदी घेतली नाही

अपघात घडल्यानंतर काही वेळातच योगायोगाने हवेली पोलीस ठाण्याची गाडी त्या ठिकाणी आली. गाडीत वरिष्ठ अधिकारीही होते, रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जखमी झालेले दोघे रस्त्याच्या कडेला विव्हळत पडलेले होते. पोलीस गाडीचे चालक आणि एक होमगार्ड यांनी खाली उतरून जखमींची माहिती घेतली आणि जखमींना रुग्णवाहिकेत बसविण्यास मदत केली; मात्र एवढा मोठा अपघात झालेला असताना पोलीस गाडीत बसलेल्या 'साहेबांनी'खाली उतरण्याची तसदी घेतली नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT