Two Wheeler Accident
Two Wheeler Accident Sakal
पुणे

दुचाकीला मागे टाकणे बेतले जीवावर; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

भरधाव दुचाकी चालविताना पुढच्या दुचाकीला पाठीमागे टाकण्याचा प्रकार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अक्षरशः जीवावर बेतला.

पुणे - भरधाव दुचाकी (Two Wheeler) चालविताना पुढच्या दुचाकीला पाठीमागे टाकण्याचा प्रकार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (Students) अक्षरशः जीवावर बेतला. भरधाव दुचाकीचा दुसऱ्या दुचाकीला धडकुन झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वार विद्यार्थ्यासह त्याच्या पाठीमागे बसलेल्या मित्रही गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यु (Death) झाला. हि घटना बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कात्रज बोगद्याजवळ कोळेवाडी परिसरात घडली.

रोहित शामसुंदर मणियार (वय 25, रा.सिद्धनाथ कॉम्प्लेक्‍स, वडगाव), समीर विलास काळे (वय 25, रा.मांगडेवाडी, कात्रज) असे अपघातात मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी संदिप मांडगे यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहन देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित, समीर व त्यांचे काही मित्र बुधवारी रात्रीच्या सुमारास कात्रज बोगद्याच्या परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते.

जेवण झाल्यानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन दुचाकींवरुन ते त्यांच्या घरी येत होते. रोहित व समीर हे दोघे एका दुचाकीवर होते. तर चार ते पाच जण अन्य दोन दुचाकींवर होते. रोहीत व समीरच्या मित्रांच्या दोन्ही भरधाव दुचाकी पुढे निघून गेल्या. तर पाठीमागुन रोहित व समीर येत होते. रोहित हा भरधाव दुचाकी चालवित होता. कात्रज बोगद्यातून बाहेर पडून पुण्याच्या दिशेने येत असताना कोळेवाडी परिसरात रोहितने पुढे जाणाऱ्या दुचाकीला मागे टाकण्यासाठी त्याची दुचाकी आणखी वेगात पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याची धडक पुढील दुचाकीला बसली. त्यावेळी रोहितचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी खाली पडली. या अपघातात रोहित व समीर या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान, बराच वेळ होऊनही ते दोघेजण आले नसल्याने त्यांचे मित्र त्यांना शोधू लागले, तेव्हा त्यांना अपघाताची माहिती मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT