Maharashtra Kesari: Shivraj Rakshe
Maharashtra Kesari: Shivraj Rakshe Esakal
पुणे

Maharashtra Kesari : 'डबल महाराष्ट्र केसरी' शिवराज राक्षेच्या यशामुळे कुटुंबात आनंदी आनंद, खेड तालुक्यात आनंदाचे वातावरण

महेंद्र शिंदे

कडूस - खेड तालुक्याचा कुस्तीपटू शिवराज राक्षे याने कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीरवर मात करीत महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला. मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरीचा किताब सलग दुसऱ्यांदा पटकाविल्याबद्दल शिवराजच्या राक्षेवाडी (ता.खेड) गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबाचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे.

धाराशिव येथे पार नुकत्याच पडलेल्या ६५ व्या वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी शिवराज राक्षे ठरला. महाराष्ट्र केसरी किताबासाठी हर्षवर्धन सदगीर (माती गट) विरुद्ध शिवराज राक्षे (गादी गट) या दोघांमध्ये अंतिम लढत झाली.

ही लढत अत्यंत अटीतटीची झाली. खेळ सुरू असताना हर्षवर्धन सदगीर यांच्या हाताला झटका लागल्याने जखमी झाला. अखेर शिवराज राक्षे याने हर्षवर्धन सदगीरवर एकतर्फी मात देऊन 'महाराष्ट्र केसरी किताब' पटकावला.

अत्यंत कडव्या लढतीत राक्षे याने सादगीरला धूळ चारत मानाची गदा पटकावली. या अगोदर जानेवारी महिन्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली होती.

त्यात शिवराजने विजय मिळवत महाराष्ट्र केसरीचा मान पहिल्यांदा पटकावला होता. आता सलग दुसऱ्यांदा हा बहुमान मिळविल्याने शिवराज 'डबल महाराष्ट्र केसरी' ठरला आहे. शिवराज नांदेडकडून प्रतिनिधित्व करीत असला तरी तो मूळचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या राजगुरूनगर लगतच्या राक्षेवाडी गावचा आहे.

शिवराजच्या चमकदार यशाने तालुक्यातील कुस्ती शौकिनांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. त्याच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. किताब पटकविल्यानंतर शिवराज अजून घरी आला नाही. तो धाराशिवहून थेट देवदर्शनासाठी अक्कलकोटला गेला आहे.

राक्षेवाडी गावात व कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आगमनानंतर घरी व गावात जल्लोषात स्वागत करण्याची तयारी सुरू आहे. शिवराजच्या आई सुरेखा राक्षे या गावच्या सरपंच आहेत, तर वडील काळूराम राक्षे स्वतः पैलवान आहेत.

मोठा भाऊ युवराज हा शिवराजची सावली प्रमाणे सोबत करीत त्याची काळजी घेत आहे. 'शिवराजने मोठ्या परिश्रमाने हे यश मिळवले आहे. आमच्या आनंदाला पारावर राहिला नाही,' अशी प्रतिक्रिया आई सुरेखा राक्षे यांनी दिली.

शिवराजचे चुलते व गावचे पोलीस पाटील पप्पूकाका राक्षे पाटील म्हणतात, 'एकाच वर्षी दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविण्याचा मान मिळविणे सोपी गोष्ट नाही. यामागे शिवराजची जिद्द, परिश्रम आहेत. घराचे, गावची साथ त्याला आहे. म्हणूनच कुटुंबाला व गावाला शिवराजचा अभिमान आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT