Onion sakal
पुणे

Onion : शेतकऱ्याला कांद्याच्या १६ गोण्यांना मिळाला फक्त ७१ रुपये फायदा

हमखास बाजारभाव मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, यंदा कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

सकाळ वृत्तसेवा

हमखास बाजारभाव मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, यंदा कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

उंडवडी - हमखास बाजारभाव मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, यंदा कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जिंती येथील कल्याण भानुदास वारगड या शेतकऱ्याला १६ गोण्यांचे (७७३ किलो) फक्त ७१ रुपये आले आहेत, तर मोकळ्या (बारदाना) पिशव्यांचे ५१२ रुपये देणे बाकी आहे.

सोलापूर येथील बाजारात वारगड यांनी १६ कांद्याच्या पिशव्या आज (ता. १५) पाठवल्या होत्या. त्याचे वजन ७७३ किलो भरले. कांद्याच्या दोन प्रतवारी करण्यात आल्या होत्या. यामध्ये (९ पिशव्या) ४४० किलो मालाचे ६६० रुपये झाले तर (७ पिशव्या) ३३३ रुपये झाले. असे एकूण ९९३ आले. त्यातून हमाली ६१.०७ , तोलाई ३६. ३३, स्त्री हमाली २४. ०० व मोटर भाडे ८०० रुपये असा एकूण खर्च ९२१. ४० पैसे एवढा खर्च झाला. खर्च वजा जाता वारगड यांच्या हातात अवघे ७१ रुपये मिळाले.

कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे कांद्याच्या पिकावर असलेली शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. जिंती येथील शेतकरी कल्याण वारगड या शेतकऱ्याने यंदा पाऊण एकर कांद्याची लागवड केली होती. गेल्या महिन्यात २० पिशव्या बाजारात पाठवल्या तर त्याचे फक्त दोन हजार रुपये बिल आले.

वारगड यांनी गावातील दुकानातून ५१२ रुपयांचा कांद्यासाठी मोकळ्या पिशव्या (बारदाना) आणला होता. त्याचे देणे बाकी राहिले. त्यांचा पावण एकर कांदा पिकासाठी मशागत, लागवड, बियाणे,खते, खुरपणी, औषधे, वीज बिल व मजूरी असा मिळवून पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च झाला होता. म्हणजेच कांद्याच्या पिकातून संपूर्णपणे तोटा झाला आहे.

कांद्याच्या पिकाने यंदा फसविले आहे. या पिकासाठी केलेला खर्च निघाला नाही. पदरमोड करून मातीमोल किमंतीला कांदा विकण्याची वेळ आमच्यावर आली आहे. आत्ता पुन्हा कांदा पीक करावे की नाही, अशी आमची स्थिती झाली आहे.

- कल्याण वारगड, शेतकरी, जिंती (ता. करमाळा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT