Ujani Dam
Ujani Dam 
पुणे

उजनी धरण परिसर पर्यटन केंद्र म्हणून गतीने विकसित होणे गरजेचे

डॉ. संदेश शहा

इंदापूर - उजनी धरण हे पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यास वरदायिनी ठरले असून या धरणा वर परिसराचे विकास, अर्थ तसेच राजकारण अवलंबून आहे. धरणातील पाण्यावर ४४ सहकारी व खाजगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक उद्योग अवलंबून असून, दरवर्षी ३० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम बनला असून कृषि धवल औद्योगिक क्रांती झाली आहे. धरण क्षेत्र संरक्षित ठेवून इतर परिसर पर्यटन केंद्रम्हणून नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करणे गरजेचे आहे.

धरणाला लागून पुणे सोलापूर, जलाशयास समांतर टेम्भुर्णी ते नगर राष्ट्रीय महामार्ग, दक्षिण व उत्तर भारताला जोडणारी रेल्वे वाहतूक जेऊर, कुर्डुवाडी व भिगवण स्टेशन मार्गे आहे. जलवाहतूकीसाठी दहा जलमार्ग मंजूर असून कालठण नंबर १ (ता. इंदापूर )येथे जलहवाई सेवा प्रस्तावीत आहे. त्यामुळे पर्यटन व लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत दळणवळणास देखील त्याची मदत होणार आहे. पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, जेजुरी, मोरगाव, दहिगाव, नरसिंहपूर या तिर्थक्षेत्रास दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. उजनी फुगवट्यावर क्रौंच, रोहित, बदके आदी ३५० प्रकारचे पक्षी, चिलापी, रोहू, कटला, वाम, मरळ आदी १५ प्रकारचे मासे यासह विविध पक्ष्यांचे वास्तव्य असते. यातील बहुतांश पक्षी रशियन सैबेरिया, काही पक्षी हिमालय, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात.

हिवाळी पर्यटकांना उजनी परिसर, रोहित व चित्रबलाक पक्षी आकर्षित करत असून जलाशयावर त्यांना खाद्य, संरक्षण आणि इतर अनुकूल गोष्टी आहेत. उजनी जलाशय परिसर हा सहा किलोमीटर रुंद तर दौंड ते भिमानगर अंतर १४० किलो मीटर आहे. भिगवण, गंगावळण, पडस्थळ, कुंभेज, वाशिंबे असा ५५ किलोमीटर परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे इंदापूर, माढा, करमाळा तालुक्याचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने राष्ट्रवादीचे नेते महारुद्र पाटील यांनी गंगावळण येथे पर्यटन केंद्र मंजूर केले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

भाजपा नेते, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून कालठण नंबर एक व पडस्थळ येथे अकलूज सयाजी वॉटर पार्कच्या धर्तीवर केंद्रसरकार माध्यमातून पर्यटन केंद्र होवू शकते का याची चाचपणी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव तसेच पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके करत आहेत.गोड्या पाण्यातील सर्वांत मोठी मासेमारी उजनीत होत असून मासे खवैय्याना पर्वणी ठरत आहेत. उजनी माश्यांचा ब्रँड महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल येथे निर्माण झाला असून भिगवण, इंदापूर ही ठिकाणे मत्स्य केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. उजनी पट्ट्यात मत्स्य अभ्यास,पक्षी निरीक्षण, वनस्पती अभ्यास केंद्र, प्राणी संग्रहालय, खाद्यमॉल उभारून पर्यटकांना आकर्षित करणे शक्य असून त्यातून रोजगार निर्मिती होऊन अर्थकारण देखील मजबूत होऊ शकते. मात्र परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांच्या शेती व्यवसायास धक्का न लावता पर्यटनकेंद्र विकसितझाल्यास देश परदेशातील पर्यटक या परिसराला भेटी देतील मात्र त्यासाठी नेत्यांची जबरदस्त इच्छा शक्ती हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT