पुणे

उजनीत दिवसभर विसर्गात चढ-उतार; रात्री ३० हजार क्युसेकवर

CD

उजनीत दिवसभर विसर्गात चढ-उतार; रात्री ३० हजार क्युसेकवर
सोलापूर, ता. ७ : उजनी धरणातील पाण्याची आवक आणि स्थानिक पाणलोट क्षेत्रातील परिस्थिती लक्षात घेऊन शुक्रवारी (ता. ७) दिवसभर विसर्गात बदल करण्यात आला. सकाळी धरणातून ३१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू होता. स्थानिक पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आवक वाढली. त्यामुळे पूर नियंत्रणाच्या दृष्टीने सकाळी ११.३० वाजता सांडव्यातून विसर्ग ४० हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर दुपारनंतर धरणातील आवक कमी होऊ लागल्याने रात्री ९.३० वाजता विसर्ग पुन्हा कमी करून ३० हजार क्युसेक करण्यात आला.
सायंकाळी सहा वाजता धरणाची पाणीपातळी ४९६.८२० मीटर नोंदली गेली. धरणातील एकूण जलसाठा ११७.११ टीएमसी, तर उपयुक्त जलसाठा ५३.४६ टीएमसी (९९.७८ टक्के) इतका आहे. दौंड येथून धरणात सुमारे २५ हजार ७२६ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. प्रशासनाने नागरिकांनी भीमा नदीपात्रात उतरू नये, तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT