CKL26B02917
जेऊर (ता. करमाळा) : येथील इरा पब्लिक स्कूलच्या स्नेहसंमेलनात विठ्ठल-रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशभूषेत कला सादर करताना विद्यार्थी.
---
इरा पब्लिक स्कूलमध्ये
‘उमंग २०२६’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
चिखलठाण, ता. १ : जेऊर (ता. करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग - २०२६’ उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात सुरवातीला राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, ॲड. बाबूराव हिरडे, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, माजी सभापती अतल पाटील, ‘आदिनाथ’चे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, जि.प. सदस्य लक्ष्मण गोडसे, पं.स. सदस्य धनंजय शिरस्कर उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड यांनी केले. सचिव सुनील अवसरे यांनी आभार मानले. श्रीलंका येथे होणाऱ्या अबॅकस स्पर्धा परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
विविध गुणदर्शन कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा देखावा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा देखावा सादर करण्यात आला. यावेळी विविध हिंदी गाणी, काश्मिरी गीत, आर्मी (ऑपरेशन सिंदूर), बहारदार लावणी, कोळीगीत, लक्ष्मीकांत बेर्डे, आदिवासी गीत व विठ्ठलभक्त गोरा कुंभार, जागरण गोंधळ (वाघ्या- मुरळी) गीत, पुष्पा (फिलिंग), पोतराज, नटीने मारली मिठी, शेतकरी गीत, फनी डान्स, टिपरी नृत्य अशा सर्व नृत्यांनी प्रेक्षक भारावून गेले. या कार्यक्रमाला पालक, महिला प्रेक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन बाळासाहेब तोरमल व मुख्याध्यापिका अपेक्षा अवसरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.