बेवारस ४५४ वाहनांचा होणार पंचनामा sakal
पुणे

पुण्यात बेवारस वाहनांना नोटीस; 54 वाहनांचा होणार पंचनामा

अतिक्रमण करून उभ्या असलेल्या 54 बेवारस वाहनांना नोटिसा लावण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागातील रस्त्यावर अतिक्रमण करून उभ्या असलेल्या 54 बेवारस वाहनांना (Vehicle) नोटिसा लावण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक वाहने खराडी परिसरातील आहेत.

खराडी येथील जनक बाबा दर्गा ते फाउंटन रोड भागातील सोळा, खराडी आपले घर परिसरातील दोन, वडगाव शेरी मधील चौदा, विमाननगर मधील दहा, शास्त्रीनगर आणि कल्याणीनगर येथील सहा अशा बेवारस वाहनांवर अतिक्रमण विभागाच्या चार पथकांनी नोटिसा लावल्या.

वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि परिसरातील सौंदर्याला बाधा पोहोचवणारे, अस्वच्छतेसाठी कारणीभूत ठरणारी, रस्त्यावरील बेवारस दुचाकी, तीन चाकी, आणि चार चाकी वाहने शोधण्याची मोठी मोहीम पुणे महानगरपालिकेने हाती घेतली आहे.

याविषयी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमणही निरीक्षक अनिल परदेशी म्हणाले, नोटीस लावल्यानंतर सात दिवसांनी पंचनामा करून ही सर्व वाहने दोन क्रेनच्या मदतीने रस्त्यावरून हटवण्यात येणार आहेत. रस्त्यावर पडलेली वाहने त्यांच्या मालकांनी लवकरात लवकर हटवावीत.

रस्त्यावरील बेवारस वाहनानंपैकी अनेक वाहनांचे क्रमांक, काहींची इंजिनच गायब आहे. दिलेल्या नोटिशीला प्रतिसाद न आल्यास पंचनामा करून ही वाहने जप्त केली जाणार आहेत. शिवाय कारवाईचा खर्च वाहन मालकांकडून वसूल केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT