बारामती, ता. ८ : बारामती नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक नऊमधील देवगिरी कॉर्नर, प्रगतीनगर येथे आवश्यक विकास परवानगी व मंजूर बांधकाम नकाशाविना बहुमजली बांधकाम केल्याप्रकरणी धनराज गोविंद गव्हाणे यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बारामती नगरपरिषदेचे क्षेत्रीय अधिकारी कृष्णा रामचंद्र धोरे यांनी फिर्याद दिली. गोरख पांडुरंग गवळी आणि बापूजी लोखंडे यांनी संबंधित बांधकामाबाबत तक्रारी केल्या होत्या. पाहणीदरम्यान सुमारे १० ते १५ हजार चौरस फूट क्षेत्रात बहुमजली आरसीसी बांधकाम सुरू असल्याचे आढळले.
नगरपरिषदेने कामबंद नोटीस बजावूनही बांधकाम सुरू ठेवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. नोटीस बजावल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत किंवा बांधकाम हटविण्यात आले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.