महापालिकेच्यावतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली. Sakal
पुणे

आंबेगाव खुर्दमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा

आरक्षित जागेवरील बांधकाम हटविले

सकाळ वृत्तसेवा

आंबेगाव - नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या आंबेगाव खुर्द परिसरातील सर्व्हे नं ५० मधील हिल टॉप हिल स्लोप आरक्षित जागेवरील बांधण्यात आलेली अनाधिकृत बांधकामे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन २ कडून हटविण्यात आली. परिसरात होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाला शहर बांधकाम विभागाकडून नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. परंतु, दिलेल्या नोटीसांकडे कानाडोळा करत विकासक अनधिकृतपणे बांधकाम करत होते.दरम्यान या अनाधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली आहे.

आंबेगाव खुर्द सर्व्हे नं ५० मध्ये हिल टॉप हिल स्लोप झोन टाकण्यात आलेला आहे. या आरक्षित जागेवर बांधकाम करण्यास कोणतीही परवानगी नसताना अनधिकृत बांधकामचे लोन पसरले होते.याबाबत बांधकाम विभागाने नोटिसा बाजवण्या होत्या. तरीही बांधकामे सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई नंतर परिसरातील विकसकांमध्ये चांगलीच तारांबळ झाली आहे.यामध्ये ८ मिळकतीचे १०५०० चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे, उपअभियंता प्रताप धायगुडे, कनिष्ठ अभियंता हेमंत कोळेकर,अभिजित भुजबळ यांच्या पथकाने तीन जेसीबी, तीन गॅस कटरच्या साहाय्याने मनपा व भारती विद्यापीठ पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई केली.

मनपा कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ठ गावात डोंगर उतारावर हिल स्टॉप हिल स्लोप आरक्षण आहे.आरक्षित जागेवर नागरिकांनी बांधकामे करू नयेत.तसेच अनधिकृत सदनिका घेऊ नयेत. मनपा आयुक्त यांच्या आदेशाने नियमित कारवाई होणार आहे.

-प्रताप धायगुडे, उपअभियंता बांधकाम विभाग २.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT