पुणे

उंडाळे. आदर्श भजनी मंडळाला 25 हजाराचे अनुदान

CD

उंडाळ्यातील ‘आदर्श भजनी’ला अनुदान

उंडाळे, ता. १६ ः येथील आदर्श भजनी मंडळाला भजनी साहित्य खरेदीसाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून २५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले. महाराष्ट्र राज्य उत्सव तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या योजनेंतर्गत भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मदत उपलब्ध झाली आहे.

कऱ्हाड तालुक्यातील जास्तीतजास्त भजनी मंडळांना अनुदान मिळावे, यासाठी आमदार डॉ. भोसले यांच्या कार्यालयामार्फत अर्ज भरून घेतले होते. संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून पात्र मंडळांना अनुदान मंजूर केले. त्याअंतर्गत येथील आदर्श भजनी मंडळालाही २५ हजारांचे अनुदान उपलब्ध झाले. या निधीतून मंडळाने आवश्यक असलेले भजनी साहित्य खरेदी करून सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहन केले आहे. या अनुदानाबद्दल भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. भोसले यांचे आभार मानले. यावेळी आदर्श भजनी मंडळाचे अध्यक्ष महादेव कदम, उपाध्यक्ष अशोकराव पाटील, सचिव विलास माळी, खजिनदार नानासाहेब सुतार, सदस्य साहिल सुतार, तानाजी लोहार, संजय जाधव, दिनकर गुरव, पुष्पा माळी, सुरेखा गुरव, रुक्मिणी गुरव, वंदना लोहार उपस्थित होते. यावेळी या अनुदानपत्राचे वितरण अशोकराव पाटील, भास्कर पाटील, प्रमोद पाटील यांच्या हस्ते केले.


A00844
उंडाळे ः अशोक पाटील, भास्कर पाटील यांच्याकडून अनुदान प्रमाणपत्राचे स्वीकारताना विलास माळी, महादेव कदम व सदस्य.
.................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अबरार अहमदला करारबद्ध करणाऱ्या काव्या मारनच्या SRH ला सुनील गावस्करांनी सुनावले; म्हणाले, या पैशातून ते आपले जवान मारतात...

Mumbai: गाड्यांवरील लुकलुकणारे दिवे हटवले, वादंगानंतर पालिका प्रशासनाची तातडीची कारवाई

चिंता वाढली! वॉकिंग स्टिकचा आधार घेत BCCI पुरस्कारांसाठी पोहचला टीम इंडियाचा खेळाडू; VIDEO

Latest Marathi Update : एमआयडीसीविरोधात मावळमध्ये संताप; स्मशानभूमीसाठी नागरिकांचा तहसील कार्यालयावर प्रेतयात्रा मोर्चा

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

SCROLL FOR NEXT