An unidentified vehicle in the kills an one man at Chikhali
An unidentified vehicle in the kills an one man at Chikhali 
पुणे

पिंपरी : चिखलीत अज्ञात वाहन अंगावरुन गेल्याने एक ठार 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिखली येथील स्पाईन रस्त्यावर अज्ञात वाहन अंगावरुन गेल्याने प्रौढ इसमाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी, चिखली पोलीसांनी आरोपी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नामदेव फकिरप्पा श्रीगोंड (वय 54, रा.चिखली, सध्या सोलापूर) असे मयत इसमाचे नाव आहे. स्पाईन रस्त्यावरील गणेश टायर्स दुकानाजवळ रात्री हा अपघात घडला. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका कंपनीत श्रीगोंड हे कामास होते. परंतु, काही कारणास्तव कंपनी बंद पडली. त्यामुळे, ते सोलापूरला स्थलांतरीत झाले होते. कंपनीतील शिल्लक पैसे घेण्यासाठी ते नातेवाईकांकडे मुक्कामी होते. पैसे घेण्यासाठी जाताना ते रस्त्यावर पडले. तेव्हा, त्यांच्या अंगावरुन अज्ञात वाहन निघून गेले. त्यात, श्रीगोंड यांच्या डोक्‍याला व छातीला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

पुणे : वारज्यात गटाराच्या चेंबरमध्ये सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह  

आरोपी वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी, त्यांच्या पत्नी श्रीमती शारदा नामदेव श्रीगोंड (वय 46, रा.ओमसाई हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT