पुणे : वारज्यात गटाराच्या चेंबरमध्ये सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह

An unidentified woman's body was found in a gutter chamber at  Warje Malwadi in pune
An unidentified woman's body was found in a gutter chamber at Warje Malwadi in pune

वारजे माळवाडी(पुणे) : येथील 'बीएसयूपी' सोसायटीच्या मागील महादेव मंदिर परिसरातील पालिकेच्या गटाराच्या चेंबरमध्ये 35 वर्ष अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला.  स्थानिक नागरिकांना या सिटीच्या मागे पालिकेच्या 'बीएसयूपी' सोसायटीच्या पुढे असलेल्या 'बीडीपी'च्या हद्दीत मृत व्यक्तीचा वास या परिसरात येत असल्याचे या परिसरात पाहिल्यानंतर चेंबरमध्ये मृतदेह आढळला.

‘एचआयव्ही’वरील औषधांचा तुटवडा

चेंबरच्या पाण्यात मृतदेह कुजून फुगलेला आहे. तिच्या गळ्यात धातूची साखळी असून तिच्यावर इंग्रजी 'एन' अक्षर आहे. तिच्या उजव्या हातात देवीचा लाल पिवळ्या रंगाचा धागा आहे. कुर्ता गुलाबी रंगाचा असून त्याच्यावर डिझाइन आहे तर सलवार चॉकलेटी रंगाचा आहे.  या बाबत पोलिसांनी सध्यातरी आकस्मित मयत अशी प्राथमिक नोंद केली आहे. अंगावर जखमेचे वार, व्रण दिसत नाहीत. खून की आत्महत्या याबाबत काही माहिती मिळाली नाही. अशी माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

#GreenPune आयटीयन्सची ‘सायकल टू वर्क’ चळवळ 

मुठा नदीच्या पात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह

दरम्यान, 21 ऑक्टोबर 2019 रोजी मुठा नदीच्या पात्रात एका बॅगेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. पश्चिम बाह्यवळण महामार्गावर नदीच्या पुलाखाली ही बॅग आढळली होती. या मृतदेहाची देखील अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत देखील पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com