1puneuniversity_6.jpg
1puneuniversity_6.jpg 
पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होाणार 'अपरिचित पुलं'

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला (शनिवार, ९ फेब्रुवारी २०१९) “अपरिचित पुलं” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सायं. ६.३० वाजता मुख्य इमारतीमागील मुख्य मंडपात होणार आहे. तो सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती ‘शब्द वेध’ संस्थेतर्फे करण्यात आली आहे. त्याचे दिग्दर्शक चंद्रकांत काळे आहेत. संगीत  नरेंद्र भिडे यांचे आहे, तर सतीश आळेकर, गजानन परांजपे आणि चंद्रकांत काळे हे त्याचे सादरीकरण करणार आहेत.

या कार्यक्रमात ख्यातनाम लेखक व साहित्यिक दिवंगत पु. ल. देशपांडे यांच्या फारशा माहीत नसलेल्या लेखनाचे साभिनय वाचन केले जाणार आहे. त्यातून ‘पुलं’ कलाकार, गीतकार, विडंबनकार म्हणून व्यक्त होतात. त्याचबरोबर त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी होती, हेही स्पष्ट होते. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT