Sugar Mill Sakal
पुणे

शेतकऱ्यांना एफआरपी दिली जात नाही, तोपर्यंत कारखान्यांना गाळप परवाना नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एफआरपी थकविणाऱ्या राज्यातील ४३ साखर कारखान्यांना यंदाच्या हंगामात गाळप परवाना देण्यात आलेला नाही. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची सुमारे तीनशे कोटींची एफआरपी थकविली आहे. शेतकऱ्यांना एफआरपी दिली जात नाही, तोपर्यंत त्या कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली आहे.

राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गाळप हंगामाला सुरवात झाली आहे. राज्यात सध्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच साखर आयुक्त गायकवाड यांनी कारखान्यांना मोठा दणका दिला आहे. परवाना रोखण्यात आलेल्या साखर कारखान्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.

या साखर कारखान्यांचा परवाना रोखला

सिद्धनाथ शुगर सोलापूर, जरंडेश्वर शुगर, आयन मल्टीट्रेड (बाणगंगा ससाका, सोलापूर), घृष्णेश्वर शुगर औरंगाबाद, एसजीझेड तासगाव कोल्हापूर, साईकृपा नगर, रत्नप्रभा (गो. दूधना) रेणुका नांदेड, मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट सोलापूर, त्रिधार (नरसिंह) नांदेड, अंबाजोगाई औरंगाबाद, भाऊसाहेब बिराजदार सोलापूर, संत दामाजी कारखाना सोलापूर, युटेक शुगर नगर, खंडाळा तालुका किसनवीर पुणे, कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना इंदापूर, किसनवीर भुईंज, कुंटुरकर शुगर नांदेड, साईबाबा नांदेड, नीरा भीमा कारखाना पुणे, वैद्यनाथ कारखाना परळी, रामेश्वर कारखाना जालना, भैरवनाथ शुगर, डॉ. बा. बा. तनपुरे नगर, पन्नगेश्वर कारखाना, रामेश्वर, सिद्धेश्वर, समृद्धी शुगर, व्यंकटेश्वरा नागपूर, यशवंत कारखाना खानापूर, गडहिंग्लज, घोडगंगा, हुतात्मा अहीर, आजरा, मकाई कारखाना, इंद्रेश्वर कारखाना सोलापूर, भीमा-टाकळी कारखाना, चंद्रभागा सोलापूर, विठ्ठल रिफायनरी सोलापूर, शरयू शुगर पुणे.

"एफआरपी थकविल्यामुळे ४३ साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आलेला नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत एफआरपी देत नाहीत, तोपर्यंत गाळप परवाना दिला जाणार नाही. यंदा अतिरिक्त ऊस असला तरी त्याचा गाळप हंगामावर परिणाम होणार नाही."

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन फसलं

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT