विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील पोलिस कारवाईवरून विरोधी पक्षांनी अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करताना संसदेचे कामकाज रोखून धरले आहे. तर, सरकार चर्चेला तयार असूनही विरोधक चर्चा होऊ देत नसल्याचा आरोप सरकारकडून केला जात आहे. या गदारोळामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशनात १९ दिवसांपासून किरकोळ अपवाद वगळता काहीही कामकाज होऊ शकलेले नसून गोंधळातच महत्त्वाची विधेयके चर्चेविना मंजूर झाली आहे. यापार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी संसदीय लोकशाहीच्या इतिहासात अशी परिस्थिती अभूतपूर्व आहे, यामुळे आपण पूर्णपणे हताश झालो असल्याची टिपणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.