‘‘इतिहासामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे योगदान दुर्लक्षित राहिले आहे. उपलब्ध माहितीमध्ये पोकळी असलेल्या ठिकाणी कल्पनाशक्तीच्या आधारे कथा उभी करता येते. मात्र, या कथेला तथ्यांचाच आधार हवा,’’ असे स्पष्ट मत लेखिका नीता कुलकर्णी यांनी व्यक्त केले. इतिहास आणि काल्पनिक साहित्य यांच्यातील संबंध स्पष्ट करताना त्यांनी आपल्या कौटुंबिक तसेच पेशव्यांच्या इतिहासाचा संदर्भ दिला. ‘इतिहास कोणाच्या मालकीचा? तथ्यांचा की कल्पनाशक्तीचा?’ या विषयावरील विशेष चर्चासत्रामध्ये त्या बोलत होत्या.
इतिहासातील तथ्ये आणि साहित्यिक कल्पनाशक्ती यांच्यातील संबंध, भूतकाळाचे चित्रण करताना लेखकांची जबाबदारी आणि इतिहासातील दुर्लक्षित घटनांना लेखनात मिळणारे स्थान आदी मुद्यांवर यावेळी विचारमंथन झाले. या चर्चासत्रामध्ये संशोधक आणि लेखिका मित्रा देसाई, लेखिका नताशा शर्मा आणि नीता कुलकर्णी या सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार, लेखिका कल्याणी सरदेसाई यांनी केले. वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
प्रतिक्रिया
फाळणीच्या काळामध्ये अपहरण झालेल्या आणि नंतर भारतात परत आणलेल्या महिलांच्या वेदना, संघर्ष आणि अनुभवांना इतिहासात पुरेसे स्थान मिळालेले नाही. या महिलांच्या संमतीशिवाय त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात आले. त्यांच्या कथा समाजासमोर आणणे आवश्यक आहे. इतिहास लेखन करताना लेखकाने स्वतःच्या भावना बाजूला ठेवून घडलेल्या घटनांचे निष्पक्ष आकलन करायला हवे.
- नताशा शर्मा, लेखिका
देवीवरील पारंपरिक उपचारपद्धती आणि लसीकरणाच्या इतिहासात भारतीय पूर्वजांचे मोठे योगदान होते. मात्र, वसाहतवादी इतिहासलेखनात या योगदानाची पुरेशी नोंद होऊ शकली नाही. इतिहासातील अशा दुर्लक्षित योगदानाचा शोध घेऊन तो समाजासमोर आणण्याची गरज आहे. भारतातही भूतकाळातील अन्यायकारक घटनांवर खुलेपणाने चर्चा होणे आवश्यक आहे.
- मित्रा देसाई, संशोधक आणि लेखिका
- फोटो क्रमांक ः 26B19124
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.