लोगो : सकाळ इम्पॅक्ट
---
UPB26B04187
उपळाई बुद्रूक (ता. माढा) : येथील गावालगतच्या ओढ्यात सीना-माढा योजनेचे आलेले पाणी.
---
अखेर उपळाईकरांची भागली तहान!
सीना-माढा योजनेचे पाणी ओढ्यात सोडले; ग्रामस्थांना दीड महिन्याचा दिलासा
सकाळ वृत्तसेवा
उपळाई बुद्रूक, ता. १५ : ‘योजनेचे पाणी वाहतेय, पण उपळाईकर मात्र तहानलेलेच’, या मथळ्याखाली ‘सकाळ’ने ६ नोव्हेंबर रोजी उपळाई बुद्रूकच्या पाणीटंचाईबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गावालगतच्या ओढ्यात सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. सीना-माढा योजनेची पाइपलाइन गावाच्या हद्दीतून जात असतानाही गावाला पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती ‘सकाळ’ने मांडली होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय साधून ओढ्यात पाणी सोडण्याची कार्यवाही केली. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न महिना-दीड महिना सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, हा दिलासा तात्पुरता असून गावासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था उभारावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
---
चौकट
पाणी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न
उपळाई बुद्रूकचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्या माधुरी मोरे, बावीचे माजी सरपंच मुन्नाराजे मोरे, पंचायत समिती सदस्य प्रा. नितीन झाडबुके आणि उपळाई खुर्दचे माजी सरपंच संदीप पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून गावाला सीना-माढा योजनेचे पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.