पुणे

पुणे : उरसळ फार्मसीकडून ऑनलाईन क्लासरुमचा प्रभावी वापर

सकाळवृत्तसेवा

पुणे : खराडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालयात ऑनलाईन क्लासरुमचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. घरात बसलेल्या विद्यार्थ्यांना गुगल ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून नोट्स, प्रश्नावली ऑनलाईन पाठविण्यात येत आहे. 

परीक्षा जवळ आलेल्या असताना कोरोना लाॅकडाऊनमुळे महाविद्यालय बंद झाले. महाविद्यालयाच्या डी. फार्मेसी, बी.फार्मेसी व एम.फार्मेसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन क्लास सुरू करण्यात आले. 
यात विषयानुसार दिवसभरात वेळ विभागुन देण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन यामध्येच करावे, अशा सूचना प्राध्यापकांना करण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सऍप व फेसबुक या समाज माध्यमांचा ही यात आवश्यकतेनुसार वापर करण्यात येत आहे, याशिवाय मोबाईल काॅन्फरंसिंग काॅलिंगचाही वापर करताना प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यात नियमित संवाद होत, असे प्राचार्य डॉ. अशोक भोसले आणि प्राचार्य सचिन कोतवाल यांनी सांगितले. 

उपप्राचार्या डॉ विजया बर्गे, विभाग प्रमुख विक्रम वीर, मनोज जोगराना या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत असून, मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव व पुणे विद्यापीठाचे आदिसभा सदस्य संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख,उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव एम एम जाधव यांनी या प्रयत्नांचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT