बेल्हे, ता. ११ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वाहतुकीसाठी धोकादायक असलेल्या नादुरुस्त पुलांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या मुख्य अभियंत्यांकडे निवेदन देण्यात आले आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राज्य मार्ग क्रमांक ११२वरील मंचर-बेल्हे रस्त्यावरील कुकडी नदीवरील पूल तसेच मंचर-बेल्हे रस्त्यावरील कुकडी डावा कालव्यावरील पूल, नारायणगाव-खोडद-निमगावसावा रस्त्यावरील प्रमुख जिल्हा मार्ग ४८वरील मीना कालवा पूल, आळे-बोरी- शिंगवे रस्त्यावरील प्रमुख जिल्हा मार्ग २१वरील कुकडी डावा कालवा पूल, एनएच ७६१ ते रानमळा रस्त्यावरील (ग्रामपंचायत ३८४) स्मशानभूमी ओढ्यावरील पूल, प्रमुख जिल्हा मार्ग ८ भोरवाडी-बेल्हे रस्त्यावरील जाधववाडी हद्दीतील कुकडी डावा कालवा पूल या पुलांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. संबंधित पुलांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची तसेच तातडीने दुरुस्ती गरज आहे. नादुरुस्त पुलांच्या दुरुस्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून निधीची तरतूद करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित पुलांवरून वाहतूक करताना नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने, एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.