swine flu
swine flu 
पुणे

पुणे- 'स्वाईन फ्लू'मुळे पती-पत्नीचा मृत्यु

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (ता. हवेली) - येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसापुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु झाला. केवळ तेरा दिवसाच्या आत पती-पत्नीचा मृत्यु  मृत्यु स्वाईन फ्लुमळे झाल्याने कांचन कुटुबियांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. उरुळी कांचन गावात अवघ्या तेरा दिवसाच्या आत तिन जनांना स्वाईन फ्लुच्या संसर्गामुळे मृत्युला सामोरी जावे लागल्याने उरुळी कांचन व परीसरात खळबळ उडाली. 

उरुळी कांचन गावठाणातील अस्वच्छता, वातावरणात होणारे अचानक बदल आणि साथीच्या रोगांना अटकाव करण्यास ग्रामपंचायतीसह जिल्हा परीषदेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याने मागील काही दिवसात डेंगी व अन्य साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे.  केवळ उरुळी कांचन गावातील खाजगी रुग्नालयात दाखल झालेल्या साथीच्या रुग्णांची माहिती घेतली असता, ती संख्या पाचशेहुन अधिक संख्येवर पोचली आहे. एकीकडे स्वाईन फ्लुची भिती तर दुसरीकडे डंगीचा धोका अशा दुहेरी पेचात उरुळी कांचनचे ग्रामस्थ अडकले आहेत. साथीचे रोग आटोक्यात आणण्याऐवजी जिल्हा परीषदेचा आरोग्य विभाग कागदी घोडी नाचवण्यात मग्न आहे तर दुसरीकडे उरुळी कांचनच्या सरपंचावर अविश्वाश ठराव मंजुर झाल्याने प्रशासनावर कोणाचा धाक उरलेला नाही. अशा स्थितीत साथीच्या रोगाची स्थिती सुधारण्यासाठी कोणी वाली उरला नसल्याने, आता देवच यातुन वाचवेल अशी केविलवाणी स्थिती नागरीकांची निर्माण झाली आहे. 

उरुळी कांचन परीसरात स्वाईन फ्लु व डेगी सदृश साथीच्या तापाच्या रुग्णांची आकडेवारी वेगाने वाढत असल्याच्या वृत्तास उरुळी कांचन परीसरातील अनेक खाजगी रुग्नालयाच्या डॉक्टरांनी दुजोरा दिला. उरुळी कांचन गावातील काही कुटुंबे पुर्णतः आजारी आहेत. तर काही डाॅक्टर, लोकप्रतिनिधीही यातुन सुटलेले नाहीत. उरुळी कांचन येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने आठवडाभरापुर्वी केलेल्या सर्वेतक्षणात केवळ पन्नासच्या आसपास डेंगी सदृश्य तापाचे रुग्ण आढळल्याची नोंद असली तरी, प्रत्यक्षात स्थिती मात्र अतिशय गंभीर आहे.

उरुळी कांचन परीसरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात गेले की, डेंगी किंवा डेंगी सदृश्य रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आढळुन येत आहेत. केवळ उरुळी कांचन परीसरातील खाजगी रुग्नालयाचा विचार केल्यास, डेंगी सदृश्य तापाचे रुग्न पाचशेहुन अधिक रुग्न उपचार घेत आहेत. असी स्थिती असतानाही जिल्हा परीषदेचा आरोग्य विभाग मात्र स्रवेक्षणाची कागदी घोडी नाचवण्यात दंॆग आहे. तर सरपंच कोण होणार व कोण करणार या विवंचणेत ग्रामपंचायतीचे सदस्य मशगुल असल्याने नागरीका्ना कोणी वालिच नसल्याचे चित्र आहे. 

ग्रामपंचायतीच्या वतीने बोलताना ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनिल कांचन म्हणाले, उरुळी कांचन परीसरात पाचशेहुन अधिक डेंगी सदृश्य तापाचे रुग्ण उपचार घेत आहेत ही बाब खरी आहे. गावाला सध्या सरपंच व उपसरपंच नसल्याने, प्रशासन ढिले पडले आहे. त्याचा परीणाम साथीचे रोग पसरणाऱ्यावर झालेला आहे. जिल्हा परीषदेचा आरोग्य विभाग केवळ कागदोपत्री सर्वेक्षण करुन, नागरीकांची व जिल्हा परीषदेच्या पदाधिकाऱ्यांची दिशाभुल करीत आहे. स्वाईऩ फ्लुमुळे् अवघ्या तेरा दिवसात तिन जणांना मृत्युला सामोरी जावे लागले असतानाही, हा रोग इतरांना होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत हे वास्तव आहे.  

स्वाइन फ्लूची लोणी काळभोर येथे दहा जणांना लागण ; एक मृत्युमुखी
स्वाइन फ्लूने आपले हातपाय पसरले असून कदमवाक वस्ती येथील एका खाजगी रुग्णालयात तब्बल दहा स्वाइन फ्लूचे रुग्ण दाखल झाले. तर सोमवारी (ता. २४) एक जणाचा मृत्यू झाला. पूर्व हवेलीत एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याची पहिलीच वेळ आहे. ही परिस्थिती प्रशासन कसे हाताळते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT