Rajesh-Deshmukh Sakal
पुणे

दुसरा डोस न घेणाऱ्यांचे महिनाभरात लसीकरण; डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही.

पुणे - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही. दुसरा डोस न घेतलेल्या या सर्व नागरिकांचे महिनाभरात लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना व्यवस्थापनाबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिरुरचे प्रांताधिकारी संतोष देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पाच जूनअखेर मागील आठवड्याच्या तुलनेत ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने आरोग्य विभागाच्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोना तपासणी आणि कोरोना प्रतिबंधासाठी ‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस

जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्या लाभार्थ्यांचे महिनाभरात संपूर्ण लसीकरण करण्यात यावे. १२ ते १४ वयोगट आणि १५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे. ६० वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस) देण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. लसीकरण प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या यादीनुसार घरोघरी भेट देऊन लसीकरण करावे. वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांची वारीमार्गावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

  • प्रत्येक तालुक्यांत किमान एक कोविड केअर सेंटर

  • कोरोना रुग्णांच्या तपासणीवर अधिक भर देणार

  • चाचणी सकारात्मक आलेल्या रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

  • इन्फ्लूएंझा सदृश्य आजार, अतितीव्र श्वसनमार्ग आजार संसर्गबाबत सर्वेक्षण

  • पुरेशा ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT