Covishield and Covaxin Sakal
पुणे

पुणे शहरात शनिवारी १९५ ठिकाणी होणार लसीकरण

पुणे महापालिकेतर्फे उद्या (शनिवारी) कोव्हीशील्ड १८८ ठिकाणी तर ७ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे लसीकरण केले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेतर्फे (Pune Municipal) उद्या (शनिवारी) कोव्हीशील्ड (Covishield) १८८ ठिकाणी तर ७ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे लसीकरण (Covaxin Vaccination) केले जाणार आहे. गेले आठवडाभर लसीकरण बंद असल्याने दुसऱ्या डोससाठी (Dose) अनेक नागरिक प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे कोव्हीशील्डची ७० टक्के लस दुसऱ्या डोससाठी उपलब्ध असणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेला गुरुवारी ७४ हजार कोव्हीशील्ड आणि ५ हजार कोव्हॅक्सीनचे डोस मिळाले होते. त्याद्वारे आज (शुक्रवारी) जवळपास १९३ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. पण डोसची संख्या कमी करण्यात आली आहे.

शनिवारी कोव्हीशील्डच्या १८८ केंद्रांवर प्रत्येकी २०० ऐवजी १३० डोस पुरविण्यात येणार आहेत. तर कोव्हॅक्सीनचे प्रत्येक केंद्रावर ५०० डोस उपलब्ध असतील.

कोव्हीशील्ड

- पहिल्या डोससाठी १५ टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

- पहिल्या डोससाठी १५ टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (२२ मे) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी ३५ टक्के लस ऑनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी ३५ टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सीन

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

- १७ जुलै पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT