Vaccination Sakal
पुणे

आळंदीत लसीकरणासाठी वशिलेबाजी

कोविशिल्ड लसीचा डोस घेण्यासाठी रांगेतील उभ्या नागरिकांना डावलून वैद्यकिय कर्मचारी, नगरसेवक तसेच पोलिसांच्या नातेवाईकांचीच घुसखोरीची रिघ आज दिसून आली.

विलास काटे

आळंदी - कोविशिल्ड लसीचा (Covishield Vaccine) डोस घेण्यासाठी रांगेतील (Line) उभ्या नागरिकांना डावलून वैद्यकिय कर्मचारी, नगरसेवक तसेच पोलिसांच्या नातेवाईकांचीच (Relatives) घुसखोरीची रिघ आज दिसून आली. तासनतास रांगेतील नागरिकांना (Public) साधे बसायला जागा नाही, प्यायचे पाणी नाही आणि त्यातच वशिलेबाजी (Preferential) पाहून आळंदीकरांना (Alandi) डोस नको पण कुत्रं आवर असे म्हणायची विदारक परिस्थीती लसीकरण मोहिमेतील केंद्रावर (Vaccination Center) दिसते. (Vaccination in Alandi Preferential People)

गेले काही दिवस लस उपलब्ध नाही म्हणून लसीकरण मोहिम बंद होती. आज सकाळी दहा वाजल्यापासून आळंदी पालिकेच्या शाळेमधे लसीकरण मोहिम ग्रामीण रूग्णालय आणि पालिकेच्या मार्फत सुरू झाली. रांगेत अनेक महिला,पुरूष,वृद्ध गर्दी करून होते. आधिच अस्वच्छ परिसर त्यात बसायला निट जागा नाही.कुणी उभे राहून तर कुणी दोन पायावर बसून आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत उभे राहिले. जेमतेम मोजक्याच खुर्च्या त्यावरही धुळ पाहून लोक उभेच राहणे पसंद करत होते. तासनतास रांगेत उभे राहूनही राजकीय तसेच शासकिय कर्मचा-यांच्या पाहूण्याची वशिलेबाजीच नागरिकांना पाहायला मिळाली. मग रांगेतील लोक गोंधळ घालू लागले. तरीपण कुणी नर्सचे, तर कुणी नगरसेवकाचे,तर कुणी पोलिसांची पत्नी असल्याने वशिला लावून रांगेतील लोकांना डावलून लसीकरणासाठी पुढे होत होते.

वशिलेबाजीसाठी एक शिपाई नेमला होता. एवढे करून नंबर आलाच तर दुपारी जेवणासाठी म्हणून पुन्हा दार बंद झाले. अडीच वाजता जेवणानंतर पुन्हा लसीकरण सुरू होईल म्हणून शिपायाने जोराने दार बंद केले. मात्र लसीकरणासाठी आत बोलावलेल्या नागरिकांना तुम्हांला बाहेरच थांबा म्हणून सांगितले ना अशी त्या शिपायांची ओरड चालूच होती. एकंदर लसिकरण मोहिमेतील वशिलेबाजी आणि नागरिकांना मिळणारी वागणूक यामुळे रांगेतील नागरिक माझा नंबर कधी येतो आणि मी घरी जातो असे मनोमन प्रार्थना करताना दिसून येत होता. खास करून महिला आणि जेष्ठ नागरिकांची कुचंबणा होताना दिसून आली.

लसीकरणातील वशिलेबाजी आणि येथील नेमलेला ठेक्यातील कर्मचा-यांची अरेरावीची भाषा पाहून नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर,नगरसेवक तुषार घुंडरे,मुख्याधिकारी अंकूश जाधव यांना नागरिकांनी तक्रार केली.यावर सदरच्या कर्मचा-यास काढून दुस-याची नेमणूक करण्याचे आश्वासन मिळाले. मात्र वीस मिनीटांनी पुन्हा तोच कर्मचारी लसिकरण केंद्रावर पुन्हा काम करत होता. याच कर्मचा-याच्या विरोधात चार वर्षांपूर्वी पालिकेच्या तिजोरी फोडून पैसे चोरल्याची गुन्हाही आळंदी पोलिस ठाण्यात दाखल होता. मात्र गेली दोन महिन्यांपासून लसिकरण मोहिमेत वशिलेबाजीसाठी लुडबुड करायला नेमले की काय असा सवाल नागरिक विचारत आहे.

दरम्यान आज दिवसभरात एकशे एकोणसत्तर जणांचे लसिकरण झाले.आजपर्यंत तब्बल पाच हजार दोनशे पन्नास जणांचे लसिकरण झाल्याची माहिती ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.गणपत जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी, पण भारताला २०० धावांच्या आत रोखण्यात झिम्बाब्वेला यश; श्रेयस अय्यरची टीम व्हाईटवॉश देणार?

Viral Video : अंतराळातून दिसला भारताचा थक्क करणारा नजारा; वादळी ढग अन् विजांचा कडकडाट, ISS चा व्हिडिओ व्हायरल

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

प्रदूषणामुळे वाढतोय 'डिमेंशिया'चा धोका; जीवनशैलीत करा 'हे' बदल! WHO ने सांगितले उपाय...

SCROLL FOR NEXT