पुणे

पुण्यात लसीकरण फक्त ५० ठिकाणी; नव्याने लस पुरवठा नाही

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : केंद्र व राज्य शासनाकडून नव्याने लस पुरवठा झालेला नसल्याने उद्या (मंगळवारी) फक्त ५० केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. यातील बहुतांश केंद्र उपनगरांमधील आहेत. यातील ४० केंद्रांवर कोव्हीशील्ड तर १० केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस मिळणार आहे. या ठिकाणी दुसऱ्या डोससाठीच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.

रविवारी महापालिकेला शासनाकडून २६ हजार लसीचे डोस मिळाले होते. त्यानुसार सोमवारी शहरात १११ ठिकाणी लसीकरण करण्यात आले आहे. पण मंगळवारी लस उपलब्ध झालेली नाही. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या सुमारे साडे तीन हजार डोसचे नियोजन करून मंगळवारच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे. शहरातील ३५ केंद्रांवर कोव्हीशील्डची लस दिली जाणार आहे. याठिकाणी प्रत्येक केंद्रावर १०० डोस देण्यात आले आहेत. या लसीमधील २० टक्के लस ही ज्यांनी पहिल्या डोससाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे अशांसाठी उपलब्ध असणार आहे. तर इतर पाच ठिकाणे हे पोलिस व लष्करी आस्थापनांच्या आवारात आहेत. त्या ठिकाणी ५०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या १० ठिकाणी मिळणार कोव्हॅक्सीन

कोव्हॅन्सीची लस कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय डायस प्लॉट, मालती काची दवाखाना, सावित्रीबाई फुले दवाखाना कोंढवा, छत्रपती शाहू दवाखाना केदारीनगर, भानगिरे दवाखाना हडपसर, बिंदू माधव ठाकरे दवाखाना वारजे, औंध कुटी दवाखाना औंध, संत रामदास शाळा शिवाजीनगर, गलांडे रुग्णालय नगर रस्ता या १० ठिकाणी उपलब्ध केली आहे.

कोणाला मिळणार लस

कोव्हीशील्ड - २७ मार्च पूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस व पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

कोव्हॅक्सीन - ज्यांनी १३ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळणार

१८ ते ४४ साठी दोन केंद्र

१८ ते ४४ वयोगटासाठीच्या केंद्रांची संख्या ६ वरून कमी करून २ केली आहे. यामध्ये कमला नेहरू रुग्णालयात ५०० डोस आणि राजीव गांधी रुग्णालयासाठी ५०० डोस उपलब्ध केले आहेत. ऑनलाइन बुकिंग केलेल्यांनाच ही लस मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आमदाराऐवजी मुलानेच दाबलं EVM चं बटण? दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार, जिल्हाधिकारी म्हणाले...

औरंगजेबाच्या 'या' लेकीच्या स्मरणात छत्रपती शाहूंनी बांधली खास वास्तू ; आग्रा भेटीत मोठ्या बहिणीचं योगदान

T20 WC, IND vs USA: ६ ओव्हर, ४ विकेट्स! भारताला पॉवरप्लेमध्ये अमेरिकेने दिले मोठे धक्के; अभिषेक शर्मा, शिवम दुबे पहिल्याच बॉलवर आऊट

'श्रीयुत गंगाधर टिपरे २. ०' येणार नाही... केदार शिंदेंचा धक्कादायक खुलासा; चाहत्यांचा हिरमोड करणारं मोठं कारण समोर

ZP Elections 2026 Voting Live Update : पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी एक आठवड्याची मुदतवाढ मागितली

SCROLL FOR NEXT