Aadesh Pachkudave Sakal
पुणे

लसीचा दुसरा डोस मिळाला आणि कंपनीच्या दिशेने तो इंटरव्ह्यू साठी धावला!

नऊ जण लससाठी आल्या नंतर तुम्हाला लस दिली जाईल असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

नऊ जण लससाठी आल्या नंतर तुम्हाला लस दिली जाईल असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.

रामवाडी - आदेश पाचकुडवे (वय 29) हा तरुण आज सकाळी 11 वाजता कात्रजवरुन विमाननगर येथे एका नामांकित कंपनीत इंटरव्ह्यू देण्याकरीता आलेल्या तरुणांला कोरोना लसीकरणचा दुसरा डोस घेतला नसल्याने त्यांना आतमध्ये प्रवेश नाकारला. अशा वेळी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यां कडे केवळ अर्धा तासाची परवानगी घेतली. गुगल सर्च करून वडगावशेरी भागातील मातोश्री मीनाताई ठाकरे रुग्णालयात लसीकरण सेंटर गेले. पण नऊ जण लससाठी आल्या नंतर तुम्हाला लस दिली जाईल असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. तरुणांला अखेर दीड वाजता लस मिळाली.

सकाळ पत्रकार मॅडम तुमच्या सांगण्यामुळे मला केव्हिशिल्ड चा दुसरा डोस मिळाला. मी आता इंटरव्ह्यू देऊ शकतो असे सांगत आनंदाने विमाननगरच्या दिशेने अखेर त्याने धाव घेतली. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. अशा वेळी नविन संधी मिळेल याची वाट पाहणारी तरुणाई ज्या कंपनीत काम मिळेल त्या ठिकाणी जाण्याची तयारी मनात ठेवून जात असताना, कोरोना लसीकरण नियमां कडे मात्र पाठ फिरवली जात आहे. मॉल, कंपन्या अशा अनेक ठिकाणी कोरोना लसीकरणचे दोन डोस पुर्ण झालेल्या व्यक्तिना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. साध्या वाटणार्‍या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात याचा अनेकांनी विचार केला पाहिजे. डॉ. श्रध्दा कारंडे यांनी सांगितले.

लस देण्यासाठी केव्हिशिल्ड 10 ml ची बाटली उघडली जाते. ती दोन तासात संपवायची असते. एका बाटलीतून दहा जणांना लसीकरणाचा डोस दिला जात असतो. जो पर्यत 10 जण येत नाही, तोपर्यंत लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना थांबावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT