वडगाव मावळ, ता. ५ : वडगाव नगरपंचायत क्षेत्र हे नागरी स्वरूपाचे असूनही या क्षेत्राचा ग्रामीण भागात समाविष्ट केल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर वितरणास विलंब होत आहे. त्यामुळे नागरी क्षेत्राप्रमाणे २५ दिवसात गॅस सिलिंडरचे वितरण करावे अशी मागणी वडगाव नगरपंचायतीने केली आहे. नगरसेवक अनंता कुडे यांनीही याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांना साकडे घातले आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार घरगुती गॅस सिलिंडर वितरणासाठी गॅस सिलिंडर नोंदणीमधील कालावधी ग्रामीण भाग ४५ दिवस व शहरी भाग २५ दिवस निश्चित करण्यात आलेला आहे. तीन फेब्रुवारी २०१८ रोजी वडगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले असून हे क्षेत्र नागरी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.