वडगाव मावळ नगरपंचायतीच्या कचरा डेपोत वारंवार कचरा जाळला जात आहे. त्याच्या धुरामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील स्टेशन विभागातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुरामुळे डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे अशा तक्रारी नागरिक करत आहेत. रेल्वे प्रवासी, वडगाव हद्दीतील एमआयडीसी रस्त्यालगतच्या नागरिकांनाही धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पर्यावरणाचीही हानी होत आहे. वडगाव नगरपंचायत प्रशासनाने हे वायू प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. कचरा पेटविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
- राजेंद्र नवले, तळेगाव स्टेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.