वाघ बकरी पटखेळ शिल्प Sakal
पुणे

मुळशीत सापडले भारतातील सर्वात मोठे वाघ बकरी पटखेळ शिल्प

हिंजवडी परिसरातील मारुंजी (ता. मुळशी) येथील डोंगरावर सोज्वळ साळी, नासिक व ऋषी राणे, मुंबई यांनी तब्बल ४१ खेळांचे पट शोधून त्याचे डॉक्युमेंटेशन केले.

सकाळ वृत्तसेवा

पिरंगुट : ऐतिहासिक, पौराणिक काळात राजे,महाराजे, व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिक खेळत असलेले खेळ आजही अस्तित्वात आहे. आणि त्यांचा नियमित वापर होत असल्याचा शोध नाशिकच्या प्राचीन लिपी अभ्यासक सोज्वल साळी, याने लावला आहे. हिंजवडी परिसरातील मारुंजी (ता. मुळशी) येथील डोंगरावर सोज्वळ साळी, नासिक व ऋषी राणे, मुंबई यांनी तब्बल ४१ खेळांचे पट शोधून त्याचे डॉक्युमेंटेशन केले. (Pune District Historical Places)

या अगोदर २०१९ साली आग्रावीर मारुती गोळे यांनी सर्वप्रथम हे कोरीव शिल्प,खेळ डोंगरावर शोधले होते. त्यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यावर साळी यांनी गोळे यांना संपर्क साधला होता. याबाबत गोळे म्हणाले की, हे खेळ वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्ट, नासिक यामार्फत शोध मोहीम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीवर हे खेळ कोरल्याचे अवशेष अजुनही शिल्लक असल्याचे बघायला मिळते.

कोणतेही खेळ हे केवळ शारीरिक संवर्धनासाठीच खेळले जात नाही तर मनाच्या पोषणासाठी, करमणूक, व्यापार, व्यवहारातील बोलणी करण्यासाठी आणि युध्दातील तहामध्येही खेळत असल्याचे आपल्याला माहित आहे. ज्याप्रमाणे महाभारतात जे द्युत युध्द खेळले गेले, त्या पच्चिसी खेळाचा पट नाशिकच्या पांडवलेणी अर्थात त्रिरश्मी लेण्यांमधील गुहांमध्ये कोरल्याचा शोध सोज्वल साळीने लावला आहे. यातील अनेक खेळ आजही महाराष्ट्राच्या घराघरात, दक्षिण भारत तसेच विदेशात खेळले जात असल्याचे त्याने सांगितले. पौराणिक आणि बौध्द ग्रथांमध्येही या पटखेळांचा उल्लेख आढळतो.

पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे खेळ आढळल्यानंतर राज्यासह देशभरातील विविध लेण्यांमध्येही असे खेळ आढळण्याची शक्यता त्याने वर्तविली आहे.

असे पटखेळ सापडण्याचे कारण म्हणजे पूर्वीच्या काळी इतिहास संशोधन करणारे पर्यटक, भिक्षू, संशोधक, प्रवासी, व्यापारी मुक्कामांसाठी अशा डोंगरांवर, मंदिरांमध्ये महिने, दोन महिने थांबत. त्यामुळे या काळात काय करावे तर पटखेळ खेळावे असा विचार त्या प्रवाशांच्या मनात आला असावा. त्यांनी या डोंगरावर त्या काळी, त्यांच्या देशात प्रचलित असलेले खेळ जमिनीवर कोरल्याचा अंदाज सोज्वल साळी व ऋषी राणे यांनी व्यक्त केला आहे.

पटखेळाची माहिती

मंकाला हा खेळही प्राचीन आहे. बुद्धीचा वापर करून हा खेळला जातो. यांत नशिबाचा कोणताही घटक उपयोगी येत नाही. हजारो वर्षांपासून हा खेळला जातो. इथियोपिया, सुदान, घाना, दक्षिण आफ्रिका व भारतात खेळला जातो. या गेममध्ये ४८ छिद्रांच्या बोर्डवर १२ बियांच्या सहाय्याने खेळला जातो. जो स्पर्धक जास्त बिया गोळा करू शकतो तो विजयी ठरतो. अत्यंत रंजक असा हा खेळ आहे.

वाघबकरी हा खेळ प्रामुख्याने नेपाळ, दक्षिण भारतामध्ये बघायला मिळतो. या खेळामध्ये तीन वाघ आणि १५ बकऱ्या असतात. वाघाने बकरीला खायचे तर बकऱ्यांनी मिळून वाघाला अडवायचे अशी या खेळाची संकल्पना आहे. पौराणिक काळात मंदिरांमध्ये जमिनीवर हा खेळ कोरलेला आढळतो.या खेळाचा पट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटात सुद्धा गाण्यामध्ये वाघ बकरे असा उल्लेख आढळतो तसेच त्या खेळाचा पटसुद्धा गाण्यामध्ये दिसतो. गडाचे महाकाय दरवाजा मधील दिवड्या मध्ये सुद्धा पट खेळ शिल्प आढळतात. आजही कर्नाटक मधील रानेबेंनूर मधील ग्रामीण भागात खेळ खेळला जातो.

राज्यात शोध वाढवायला हवा

प्राचीन खेळ संवर्धन मोहीम (बैठे खेळ) या नावाने फेसबुकवरील समूहात संपूर्ण महाराष्ट्रात असलेले खेळ, घराघरात खेळले जाणारे खेळ व त्यांची वेगवेगळी नावे अश्याप्रकारे या युवकांचे मॅपिंगद्वारे काम ११ जानेवारी २०२२ पासून सुरू झाले असून आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त खेळ डोकमेंटशन करून झाले आहेत. मुळशीचा हा अनमोल ठेवा दोन्ही ग्रामपंचायत नी जतन करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT