Jagannath Shetty sakal
पुणे

पुणे - वैशाली हॉटेलचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचे (Vaishali Hotel) मालक जगन्नाथ शेट्टी (Jagannath Shetty) यांचे निधन झाले.

पुणे - पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचे (Vaishali Hotel) मालक जगन्नाथ शेट्टी (Jagannath Shetty) यांचे निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी सकाळी ८ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. जगन्नाथ शेट्टी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी वैशाली हॉटेल इथे ठेवण्यात येणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुण्यात फर्ग्युसन रोडवर असलेलं वैशाली हॉटेल प्रसिद्ध आहे. जगन्नाथ शेट्टी यांचा जन्म १९३२ मध्ये झाला. वयाच्या १३ व्या वर्षी ते काकांकडे आले, त्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी जगन्नाथ शेट्टी पुण्यात आले. १९५१ मध्ये कॅफे मद्रास हे रेस्टॉरंटही सुरु केले होते. त्यानंतर मद्रास हेल्थ होम, वैशाली हॉटेल सुरु केले होते.

वैशाली हॉटेलला पुणे महापालिकेकडून क्लिनेस्ट किचन पुरस्कारही मिळाला आहे. तसंच २००० मध्ये पुण्यातील त्रिदल संस्थेनं पुण्यभूषण पुरस्कारानेही गौरव केला होता. याशिवाय चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टने जगन्नाथ शेट्टींना उद्यम गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. जगन्नाथ शेट्टी यांनी कोरोनाच्या संकटात दातृत्वाचा हातही दिला होता. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ कोटी रुपये दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT