पुणे

केळघर मेढा कार्यशाळा

CD

मेढ्यात एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात

केळघर, ता. २४ : मेढा येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विवेक वाहिनी विभागामार्फत ‘मूल्य शिक्षणाच्या कथा व विवेक’ या विषयावरील व्याख्यान व अंधश्रद्धा समज- गैरसमज व प्रयोग अशा एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालय साताराचे शिक्षणाशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जमीर मोमीन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी उपस्थित होते. यावेळी विवेकवाहिनी विभाग समन्वयक प्रा. आनंद साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. मोमीन म्हणाले, ‘‘मूल्य शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या अंगी नैतिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि मानवी मूल्यांची रुजवण करून, त्यांच्यात चांगल्या- वाईटातील फरक समजण्याची क्षमता निर्माण करणारी प्रक्रिया होय. हे शिक्षण केवळ बौद्धिक विकास नसून, व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधते आणि एक आदर्श, जबाबदार नागरिक घडविण्यास मदत करते.’’
प्राचार्य मेजर डॉ. गिरी म्हणाले, ‘‘मूल्य शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून, जगण्याची कला आणि उत्तम व्यक्तिमत्त्व घडवण्याचे साधन आहे.’’
डॉ. मोमीन व प्राचार्य मेजर डॉ. गिरी यांना प्रा. आनंद साठे लिखित महाआंतक कवितासंग्रह, राष्ट्र सेवा दलाची दिनदर्शिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. उदय पवार यांनी परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात विवेक वाहिनी प्रमुख प्रा. आनंद साठे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग करून दाखवले. प्रा. शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. ओमकार यादव यांनी आभार मानले.

--------------------------

01402
मेढा : एकदिवसीय कार्यशाळेत जमीर मोमीन यांचे स्वागत करताना अशोक गिरी. त्या वेळी इतर मान्यवर.

---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT