Vanraj Andekar sakal
पुणे

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करणाऱ्या आरोपींना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाहिले असून, त्यांच्यासमोर आरोपींची ओळख परेड करून घेतली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करणाऱ्या आरोपींना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाहिले असून, त्यांच्यासमोर आरोपींची ओळख परेड करून घेतली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी (ता.२४) न्यायालयात दिली.

विशेष न्यायालयाने या प्रकरणातील पंधरा आरोपींच्या पोलिस कोठडीत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ केली. मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला. या गुन्ह्यात अटक १५ आरोपी खून केल्यावर पसार झाले होते. त्या कालावधीत त्यांना कोणी आश्रय दिला, तसेच आर्थिक मदत केली, याबाबत चौकशी करायची आहे.

वनराजचा खून टोळीयुद्धातून झाला असून, सोमनाथ गायकवाडच्या टोळीव्यतिरिक्त आणखी कोणत्या टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास करायचा आहे. या प्रकरणात आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्याचा कट रचल्यावर मध्य प्रदेशातून कोयते व पिस्तूले आणली आहेत, तसेच गोळीबाराचा सराव केला आहे. त्याविषयी तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

पोलिस कोठडी झालेल्या आरोपींची नावे -

अनिकेत ज्ञानेश्वर दूधभाते (वय ३१), तुषार अंकुश कदम (वय ३०), दीपक किसन तोरमकर (वय २९), आकाश बापू म्हस्के (वय २४), विवेक प्रल्हाद कदम (वय २५), उमेश नंदू किरवे (वय २६), ओम धनंजय देशखैरे (वय २०), साहिल बबन केंदळे (वय २०, रा. दत्तनगर), अजिंक्य गजेंद्र सुरवसे (वय १९), संगम संपत वाघमारे (वय २०), तात्यासाहेब गायकवाड (वय १८, सर्व रा. आंबेगाव पठार), समीर किसन काळे (वय २६, रा. येवलेवाडी),सागर राजेंद्र पवार (वय ३२, रा. नऱ्हे), साहिल उर्फ टक्या निलेश दळवी (वय १९, रा. धनकवडी) आणि प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय ३३, रा. नाना पेठ) यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर वनराजची बहीण संजीवनी जयंत कोमकर, जावई जयंत लक्ष्मण कोमकर व गणेश लक्ष्मण कोमकर, प्रकाश लक्ष्मण कोमकर आणि टोळीप्रमुख सोम्या उर्फ सोमनाथ सयाजी गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT