पुणे

गणेश जन्मोत्सवानिमित्त शहरात विविध कार्यक्रम

सकाळवृत्तसेवा

पुणे - सनई-चौघड्याच्या मंजुळ स्वरातील मंत्रोच्चार, अभिषेक, पूजा, जन्माख्यानाचे कीर्तन अशा वातावरणात शहरामध्ये शुक्रवारी गणेश जन्मोत्सव साजरा झाला. शहरातील विविध ठिकाणी गणेश मंदिरांवर आकर्षक रोषणाई  करण्यात आली होती.

शहरातील विविध मंदिरांमध्ये गायन, वादन असे विविध कार्यक्रम पार पडले. भरजरी वस्त्रालंकारातल्या मूर्तीस पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात आला; तसेच जन्म दिनानिमित्त सुवासिनींनी पाळणा गायला, भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर देवस्थान, श्रीमंत पेशवे गणपती मंदिर, देवदेवेश्‍वर संस्थानचे सिद्धिविनायक मंदिर, मोदी गणपती मंदिर, गुंडाचा गणपती मंदिर, फडके गणेश मंदिर, वडाचा गणपती मंदिर यांसह शहरातील अनेक मंदिरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.  शहराचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. मिरवणुकीमध्ये मतदान जागृतीसंदर्भात फेरी काढण्यात आली, अशी माहिती कसबा गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मंदिरात मधुरा दातार यांच्या गायनासह दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही  गणेशजन्माचा सोहळा उत्साहात साजरा केला. जन्मोत्सावामुळे शहर व उपनगरांमध्ये वातावरण भक्तिमय झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT