Corona- 
पुणे

पुणे : वरवंडमध्ये चार दिवसात २२ जणांना करोनाची बाधा

अमर परदेशी

वरवंड - दौंड तालुक्यातील वरवंड परीसरात कोरोना संसर्गजन्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. गावात चार दिवसात तब्बल बावीस जणांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षतेच्या दृष्टीने नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ. शिवराणी पांचाळ यांनी केले.

मागील काही दिवसापासुन तालुक्यातील इतर मोठ्या गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी वरवंड परीसरात त्यामानाने रुग्ण संख्या कमी होती. मात्र, या ठिकाणी आठवडया पासुन कोरोनाने चांगलेच डोके वर काढले आहे. परीसरातील वेगवेगळ्या भागात रुग्ण आढळुन येत आहेत. एकाच कुटुंबातील सदस्यांना कोरोना संसर्ग होत असल्याचे आढळुन आले आहे. मागील चार दिवसात परीसरात तब्बल २२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रयोग शाळेतील प्राप्त अहवालावरुन समोर आले आहे. यामध्ये काही खासगी प्रयोग शाळेतील अहवाल आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही आरोग्य विभागाची पुरती डोकेदुखी वाढली आहे. गावात कोरोना रुग्ण वाढले असताना देखील नागरीकांमध्ये गांर्भीय दिसुन येत नाही. सकाळपासुन चौकात अनेक जण गर्दी करतात. यामध्ये वयोवृध्दांची देखील संख्या असते. अनेक व्यवसायिक देखील विनामास्क दिसुन येत आहे. कोरोना बाधीत रुग्णांमध्ये काही जण हे व्यवसायाशी निगडीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कितीजण संपर्कात आले.याबाबत मोठा संभ्रम आहे.

याबाबत आरोग्य अधिकारी शिवराणी पांचाळ म्हणाल्या,कोरोना संसर्गाचा मोठा फैलाव वाढत आहे. नागरीकांनी गर्दीत जावू नये. तोंडाला नियमित मास्क लावुनच घराबोहर पडावे. दुकादारांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोणाला काही सर्दी, खोकला, ताप काही लक्षणे असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

गावात कोरोनाच्या पाश्वभुमीवर ठोस उपयायोजना करण्यासाठी गावातील ठरावीक पदाधिकारी, आरोग्य विभागाच्या यांच्यात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे पोलिस पाटील किशोर दिवेकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT