पुणे

घेवडा, गवार, दोडका, पावट्याच्या भावात वाढ

CD

मार्केट यार्ड, ता. १० : तरकारी विभागात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने रविवारी स्थिर होती. उन्हाळा जास्त असल्याने फळभाज्यांच्या दर्जावर परिणाम होत आहे. तसेच मागणी जास्त असल्याने घेवडा, गवार, दोडका, ढोबळी मिरची व पावट्याच्या भावात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
मार्केटयार्डात राज्यासह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटकातून एक टेम्पो भुईमूग शेंग, कोबी पाच टेम्पो व घेवडा दोन टेम्पो, इंदूरमधून गाजर चार टेम्पो, आंध्रप्रदेश व तामिळनाडूतून तोतापुरी कैरी सहा टेम्पो तर शेवगा चार टेम्पो, हिमाचल येथून मटार पाच टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची १२ टेम्पो तर इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाट्याची ४० टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले ५०० गोणी, भेंडी सहा टेम्पो, गवार चार टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची तीन टेम्पो, काकडी सहा टेम्पो, फ्लॉवर १२ टेम्पो, कोबी पाच टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, गाजर चार टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, घेवडा तीन टेम्पो, पावटा दोन टेम्पो, शेवगा दोन टेम्पो, भुईमूग शेंग १५० गोणी तर कांद्याची सुमारे १०० टेम्पो आवक झाली, अशी माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे १० किलोचे भाव : कांदा : ७०-१२०, बटाटा : ७०-१४०, लसूण : ५५०-१२००, आले सातारी : ४००-६५०, भेंडी : १५०-३००, गवार : ४००-७००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : ४००-५००, हिरवी मिरची : ३००-३६०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-३५०, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी : ३५०-४००, पांढरी : २००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ६०-१००, वांगी : २००-४००, डिंगरी : ३५०-४००, नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी : ४००-४५०, जाड : २००-२२०, शेवगा : १५०-२५०, गाजर : १५०-२५०, वालवर : ४००-५००, बीट : १६०-१८०, घेवडा : १३००-१५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-३००, ढेमसे : १५०-२००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : परराज्य : ४५०-६५०, पावटा : ८००-९००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १५०-२५०, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कोथिंबीर, मेथी, पालक तेजीत
उन्हामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी पालेभाज्यांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. बाजार समितीच्या तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहीशी कमी झाली. मागणी जास्त असल्याने कोथिंबीर, मेथी, पालकच्या शेकडा गड्डीमागे ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली तर आवक-जावक कायम असल्याने उर्वरित सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव स्थिर होते. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या ८० हजार तर मेथीच्या ३० हजार जुड्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

पालेभाज्यांचे शेकडा भाव : कोथिंबीर : १००० ते २५०० , मेथी : १०००-२०००, शेपू : ८००-१५००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ५००-१०००, करडई : ५००-८००, पुदिना : ५००-१०००, अंबाडी : ४००-८००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ५००-१०००, चवळई : ४००-८००, पालक : १०००-२०००.

पपई, डाळिंबाच्या भावात वाढ
फळबाजारात फळांची आवक कमी झाली. मागणी कमी असूनही पपई, डाळिंबाच्या भावात किलोमागे पाच ते आठ टक्क्यांनी वाढ झाली. कच्च्या लिंबाचे प्रमाण वाढले आहे. कलिंगड व खरबूज ५ ते १० टक्के आणि लिंबाच्या भावात गोणीमागे १०० रुपयांनी घट झाली. इतर फळांचे भाव स्थिर होते.
फळबाजारात लिंबू १००० ते १५०० गोणी, मोसंबी २५ ते ३० टन, संत्रा एक टन, डाळिंब ३० टन, पपई १२ टेम्पो, कलिंगड ४० टेम्पो, खरबूज सहा टेम्पो, चिक्कू एक हजार गोणी, पेरू १५० क्रेट, अननस पाच ट्रक आणि हापूस आंब्यांच्या दोन हजार पेट्यांची आवक झाली, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते १२००, मोसंबी : (३ डझन) : १८०-४५०, (४ डझन) : ८०-२२०, संत्रा : (१० किलो) : ३००-१०००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : ५०-२००, आरक्ता : १०-५०, गणेश : १०-३०, कलिंगड : १०-१५, खरबूज : १२-२०, पपई : १२-२५, चिक्कू (१० किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-६००, अननस (एक डझन) : १००-६००, द्राक्षे : (१५ किलो) : ४००-१०००, रत्नागिरी हापूस : ५ ते ९ डझन (कच्चा) : १२००-३५००, रत्नागिरी हापूस : ५ ते ९ डझन (तयार) : २००० ते ३५००.

शोभिवंत फुलांना मागणी
मार्केटयार्डातील फूलबाजारात सुट्ट्या फुलांसह शोभिवंत फुलांची मागणी आणि भाव टिकून आहेत.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : १००-१५०, अ‍ॅष्टर : जुडी : १५-२०, सुट्टा : १००-१५०, कापरी : २०-४०, शेवंती : ८०-१५०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ३०-६०, गुलछडी काडी : ५०-१००, डच गुलाब (२० नग) : १००-१३०, जर्बेरा : ८०-१००, कार्नेशियन : २००-२५०, शेवंती काडी : २००-३००, लिलियम (१० काड्या) : १५००-१८००, ऑर्चिड : ५००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१५०, जिप्सोफिला : २५०-३५०, मोगरा : ५००-८००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT