CNG Pump
CNG Pump 
पुणे

वाहनांच्या तुलनेत सीएनजी पंप अपुरे

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी सीएनजी पंपांची संख्या मात्र अपुरी पडत असल्याने या पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. या पार्श्‍वभूमीवर या पंपांची संख्या ५५ वरून ७५ पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ठेवले आहे. त्यासाठी कंपनीने महापालिकांकडे जागेची मागणी केली आहे.

शहरात मध्ये झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धांच्या वेळी प्रथमच सीएनजीवरील बस पुण्यात धावल्या होत्या. त्यानंतर गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये सीएनजीचा वापर सातत्याने वाढत गेला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बाराशेहून अधिक बस, ५५ हजारांहून अधिक रिक्षा आणि दोन लाखांच्या वर धावणारी चारचाकी वाहने सध्या सीएनजीचा वापर करत आहेत. परंतु, या सर्व वाहनांच्या तुलनेत सीएनजी पंप उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येते. 

या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेतली, तर सध्या शहरात किमान ७५ पंपांची गरज आहे. सध्या ५५ पंपांद्वारे सीएनचीचा पुरवठा केला जात असून, पंपांसाठी नवीन जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत’, अशी माहिती एमएनजीएलचे संचालक (वाणिज्य) संतोष सोनटक्के यांनी दिली. पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या भागात सीएनजीचे पंप उपलब्ध आहेत. 

मात्र जिल्ह्यातील इतर भागांमध्ये सीएनजी पंप वाढण्याची गरज असून एमएनजीएलतर्फे यासाठी काही जागांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणे 
‘एमएनजीएल’ने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडे सीएनजी पंपांसाठी काही जागांची मागणी केली आहे. या जागा प्राधान्याने मिळविण्यासाठी मदत करावी, अशी मागणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. दोन्ही महापालिकांचे पदाधिकारी, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन बापट यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT